|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » Top News » औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांचा तूर जाळण्याचा प्रयत्न

औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांचा तूर जाळण्याचा प्रयत्न 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद

औरंगाबादमधील तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी तूर जाळण्याचा प्रयत्न  केला आहे. तूर गुणवत्ता निकषांवरून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची  अडवणूक केली जात असल्याने नाराज शेतकऱ्यांनी  हे पाऊल उचलले आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या  कष्टाने उगवलेली तूर घेण्यास, खरेदी केंद्र नकार देत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तूर जाळण्याचा प्रयत्न  केला आहे. विभागवार तुरीची ओळख करण्यासाठी सुतळीच्या रंगाचा वापर केला आहे. तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची  अडवणूक होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Related posts: