|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू 

मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, पुण्यात खळबळ

ऑनलाईन टीम /पुणे 

प्रख्यात मराठी नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. राहत्या घरातच त्यांची हत्या करण्यात आली असून, त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अलंकार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली कोल्हटकर आपल्या घरात पती आणि सासूसह यांच्यासोबत राहत असत. रात्री उशिरा घरातून धूर आल्याने आजूबाजूच्या लोकांना शंका आली. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले, तेव्हा त्यांना अर्धवट जळालेला मृतदेह मिळाला. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार त्यांच्या डोक्याला जखम झाल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे खळबळ उडाली आहे.

कोल्हटकर यांच्या घरात सकाळी आणि संध्याकाळी असे दोन नोकर आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांचा मुलगा विदेशात असतो, तर मुलगी पुण्यात असून, ती रोज दुपारी भेटायला जात असे. ती दुपारी भेटून गेल्यावर रात्री हा प्रकार घडला.

 

 

Related posts: