|Friday, February 22, 2019
You are here: Home » उद्योग » 2017 मध्ये 53 हजार सायबर गुन्हे : आयटी मंत्री

2017 मध्ये 53 हजार सायबर गुन्हे : आयटी मंत्री 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2017 मध्ये 53 हजारपेक्षा अधिक सायबर हल्ल्याच्या घटना घडल्याचे सराकरकडून सांगण्यात आले. या घटनांमध्ये फिशिंग, वेबसाईटचे नुकसान, व्हायरस आणि रॅनसमवेअर यांचा समावेश आहे. इंडियन कम्प्युटर इर्मजन्सी रिस्पॉन्स टीमने 2017 मध्ये 53,081 हल्ल्यांची नोंद केली आहे. 2014 मध्ये 44,679 घटना, 2015 मध्ये 49,455 आणि 2016 मध्ये 50,362 घटना नोंदविण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत सांगितले.

माहिती तंत्रज्ञान देशातील विस्तार पाहता आर्थिक घोटाळे, बँक कार्ड आणि ई वॉलेटमधील माहिती चोरण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. 2014, 2015 आणि 2016 मध्ये राष्ट्रीय गुन्हे संकलन विभागाकडे 9,622, 11,599 आणि 12,317 गुन्हय़ांची नोंद करण्यात आली आहे. सायबर गुन्हय़ांविरोधात कायदेशीर, तांत्रिक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे असे त्यांनी म्हटले. सायबर गुन्हय़ांचा तपास करण्यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सायबर सेलची स्थापना करण्यात आली आहे.

Related posts: