|Friday, January 18, 2019
You are here: Home » उद्योग » बाजारात चढ उताराचे सत्र सुरुच

बाजारात चढ उताराचे सत्र सुरुच 

बीएसईचा सेन्सेक्स 407, एनएसईचा निफ्टी 122 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक पातळीवरून कमजोर संकेत मिळाल्याने सुरुवातीला बाजारात घसरण झाली. दिवसातील सुरुवातीला बाजारात कमजोरी आल्यानंतर दिवसाच्या शेवटापर्यंत काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र अखेरीस बाजारात घसरण बंद झाली. दिवसातील कमजोरीदरम्यान निफ्टी 10,398 आणि सेन्सेक्स 33,849 पर्यंत घसरला होता.

दिग्गज समभागांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांची कामगिरी चांगली होती. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.1 टक्क्यांनी घसरत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.25 टक्क्यांनी वधारत बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.25 टक्क्यांनी वधारला.

बीएसईचा सेन्सेक्स 407 अंशाने घसरत 34,005 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 122 अंशाच्या कमजोरीने 10,455 वर स्थिरावला. बँक निफ्टी 1.75 टक्क्यांनी घसरत 25,464 वर बंद झाला.

बँकिंग, वाहन, आयटी, औषध, भांडवली वस्तू, तेल आणि वायू समभागात विक्री झाली. निफ्टीचा वाहन निर्देशांक 1 टक्का, आयटी निर्देशांक 0.75 टक्के, औषध निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरला. बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 0.75 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 0.7 टक्क्यांनी कमजोर झाला. धातू, रियल्टी, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू समभागात खरेदी झाली.

दिग्गज समभागांची कामगिरी

एचसीएल टेक, टाटा स्टील, सिप्ला, ल्यूपिन, डॉ. रेड्डीज लॅब, एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनि, टीसीएस 2.1-0.2 टक्क्यांनी वधारले. येस बँक, आयसीआयसीआय बँक, भारती इन्फ्राटेल, इन्फोसिस, एचडीएफसी, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक 2.8-1.8 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात सेल, रिलायन्स पॉवर, रिलायन्स कॅपिटल, टोरेन्ट फार्मा, पेज इन्डस्ट्रीज 9.1-3.9 टक्क्यांनी वधारले. ग्लेनमार्क, ओबेरॉय रियल्टी, सन टीव्ही, पिरामल एन्टरप्रायजेस, ईमामी 7.4-2.4 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात हॉटेल लीला, बीएफ एन्व्हेस्टमेन्ट, फोर्टिस हेल्थ, सोरिला इन्फ्रा, मर्क इलेक्ट्रॉनिक्स 19.9-10 टक्क्यांनी वधारले. अजमेरा रियल्टी, अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स, हिंदुजा ग्लोबल, एपीएल अपोलो, फिनिक्स मिल्स 13.2-5.7 टक्क्यांनी घसरले.

Related posts: