|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सहकार शिक्षण क्षेत्रात दादांचे भरीव योगदान : नाईक

सहकार शिक्षण क्षेत्रात दादांचे भरीव योगदान : नाईक 

वार्ताहर/सरूड

सहकार आणि शिक्षण या क्षेत्रासाठी दादांचे भरीव योगदान असून, जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे नेतृत्व म्हणून आजही जनमानसात अढळ स्थान असून, त्यांचे कार्य आणि विचार या अमृतगंध या ग्रंथातून प्रकट केले आहेत, असे प्रतिपादन आमदार बाबासोब पाटील-सरूडकर यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळय़ात अमृतगंध या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले.

ते म्हणाले, दादा बांधकाम सभापती, जि. प. अध्यक्ष व आमदार असताना त्यांनी लोकांचा विकास साधण्याचे, समाजाला सुविधा देण्याचे काम अखंडपणे केले. लोक जोडण्याची भूमिका अखंडणे जपली. दादा 1986 ला विश्वास उद्योग समूहात आले. विश्वास साखर कारखाना अडचणीत असताना कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम दादांनी केले. 1986 ला दादा कारखान्याचे संचालक व 1989 ला कारखान्याचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर कारखान्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. कारखान्याचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, वेगवेगळे प्रकल्प उभे करत असताना दादांचा खंबीर पाठिंबा व आशीर्वाद विश्वास उद्योगाच्या प्रगतीसाठी मोलाचा आहे. अशा थोर राजकारणी नेतृत्वाचे विचार अमृतगंध या ग्रंथाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचले जाणार असल्याने ही बाब गौरवशाली आहे

Related posts: