|Friday, August 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कब बुलबुल जिल्हा मेळाव्यात मालती माने विद्यालयाचे सुयश

कब बुलबुल जिल्हा मेळाव्यात मालती माने विद्यालयाचे सुयश 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

येथील काकासाहेब माने मे ट्रस्ट संचलित मालती माने विद्यालयाने कब व बुलबूल जिल्हा मेळाव्यात नेत्रदिपक विक्रमी सुयश मिळवले.

न्यू इंग्लिश स्कूल, अब्दुलाट येथे संपन्न झालेल्या कब बुलबुल जिल्हा मेळाव्यात रिषिका कांबळे, व सुशांते कदम हे स्मरणशक्ती स्पर्धेमध्ये प्रथम, अवंतिका सावंत  व चिन्मय भोसले हे चित्रकला स्पर्धेत प्रथम, श्रेया सुतार व्दितीय, प्राची कस्तुरे उत्तेजनार्थ तर एwश्वर्या शेळके स्मरणशक्ती स्पर्धेमध्ये तृतीय व संचिता पाटील उत्तेजनार्थ आले.

कबनी सादर केलेल्या पाणी वाचवा विषयावरील नृत्य व बुलबुलनी सदर केलेले दिपनृत्य सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम ठरले, दोन दिवस मेळाव्यात मालती माने विद्यालयाच्या बुलबुलनी केलेल्या सादरीकरणाबद्दल मानाचा फेटा देवून गौरवण्यात आले. बालवाडी विभागाने सादर केलेल्या जेजूरील नृत्याचे कौतुक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी कौतुक केले.

या मुलांसह मेळाव्यात मुख्याध्यापक संजय रेंदाळकर, मनिषा कांबळे, अंजना शिंदे, ज्योति पाटील, जयश्री मांडवकर, दिपक चौगुले आदी सहभागी झाले होते. त्यांना अध्यक्ष अमरसिंह माने, सेक्रेटरी शिवाजी जगताप, प्रशासक विमल काटकर, रेखा पाटील व सुनिल कोकणी आदीचे मार्गदर्शन व प्रोत्साहान लाभले.

 

Related posts: