|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कन्या महाविद्यालय व्दितीय

खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कन्या महाविद्यालय व्दितीय 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

कराड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय खूल्या स्कीट स्पर्धेत कन्या महाविद्यालयाला व्दितीय क्रमांक प्राप्त झाला. रोख रूपये 5 हजार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे.

कन्या महाविद्यालयाने दिलीप डोंबे लिखित व प्रा.डॉ.विनायक पवार दिग्दर्शित “पॉलिटिक्स डॉट कॉम’’ हे लघूनाटय़ सादर केले. अंकिता जाधव हिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री तर प्रा.डॉ.विनायक पवार यांना सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला. काजल पुजारी, सायली पाटील, स्नेहल पोवार, पुजा कोळेकर व अंकिता जाधव यांनी यामध्ये सहभाग घेतला.

या संघाला शिवाजी विद्यापिठ युवा महोत्सव तसेच मनोरंजन मंडळाच्या स्पर्धेतही विजेते पद मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ.अनिल पाटील व सांस्कृतिक विभागाने प्रा.सुधाकर इंडी, प्रा.सौ.प्रमिला सुर्वे, वर्षा पोतदार यांनी संघाचे अभिनंदन केले.

Related posts: