|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » रतलामच्या महापौरांना राणी बागेतील प्रदर्शनाची भुरळ

रतलामच्या महापौरांना राणी बागेतील प्रदर्शनाची भुरळ 

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते उद्घाटन; 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान उद्यान प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई महापालिकेच्या उद्यान व वफक्ष प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून भायखळा येथील राणीच्या बागेत 9 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत भरविण्यात आलेले झाडे, औषधी वनस्पती, फुले आणि भाज्यांची सुंदर मांडणी असलेल्या प्रदर्शनाची मध्यप्रदेशमधील रतलामच्या महापौर डॉ.सुनीता यार्दे यांना चांगलीच भुरळ पडली. रतलाम येथेही अशाच स्वरुपाचे प्रदर्शन भरविण्याची इच्छाही त्यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा सान्वी तांडेल यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर सान्वी तांडेल यांनी, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन आणि मदत करण्याचे आश्वासन महापौर डॉ.सुनीता यार्दे यांना दिले.

भायखळा येथील राणीच्या बागेत  झाडे, औषधी वनस्पती, फुले आणि भाज्यांची सुंदर मांडणी असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते आणि रतलामच्या महापौर डॉ.सुनीता यार्दे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी पालिका आयुक्त अजोय मेहता, नगरसेविका सुवर्णा करंजे, प्रिती पाटणकर, ऋजुता तारी, समीक्षा सक्रे, उपायुक्त किशोर क्षिरसागर, सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, डॉ.संजय त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते. पालिका उद्यान विभागाच्या कर्मचाऱयांनी या उद्यान प्रदर्शनात, हिरव्या वेळी, सुंदर फुले यांच्या माध्यमातून डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव जलपरी, कृत्रिम नदी, शिकारा, बदक, मगर, खेकडा, ऍनाकोंडा, याच्या प्रतिकृती मांडल्या आहेत. तसेच, कुंडय़ांमध्ये वाढविलेली फळझाडे, फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय, वेली, विविध प्रकारची तुळशीची झाडे, बेल, हळद, कापूर, आवळा, बेहडा, हिरडा, चंदन, बडीशेप, अश्वगंधा, बदाम, काजू, लाजाळू, जिरे, मिरी, वेलची, लवंग, जायफळ, धणे यासारखी झाडे पाहून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, रतलामच्या महापौर भारावले.

वफक्ष प्राधिकरण बिल्डरांसाठी आहे का?

मुंबईतील मेट्रो रेल्वे, एसआरए आणि अन्य प्रकल्पांसाठी मोठय़ा प्रमाणात करण्यात येणाऱया वफक्षतोडीवरून उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना फटकारले आहे. याच मुद्दय़ाचा आधार घेत महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांनी ‘वफक्ष प्राधिकरण हे वफक्षतोडीसाठी, बिल्डरांसाठी आहे का’, अशी शंका उपस्थित करीत पालिका आयुक्त यांच्यावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले.

न्यायालयात पालिकेची बाजू मांडणार : आयुक्त

मुंबई महापालिका उद्यान विभाग व वफक्षप्राधिकारण एका बाजूला झाडे, फुले आणि फळे यांचे प्रदर्शन भरवित आहे. तर, दुसरीकडे मेट्रो रेल्वे, एसआरए आणि अन्य प्रकल्पावरून वफक्षाप्राधिकरणला न्यायालयाने फटकारले आहे. याबाबत आयुक्तांना विचारले असता, आम्ही वफक्षप्राधिकरणबाबतची पालिकेची भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात मांडू, असे उत्तर देत सदर विषयावर अधिक बोलणे टाळले.

Related posts: