|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पहिल्याच बैठकीत तुकाराम मुंढेंची अधिकाऱयांना तंबी

पहिल्याच बैठकीत तुकाराम मुंढेंची अधिकाऱयांना तंबी 

नाशिक : कोणत्याही अधिकाऱयाने न विचारता आणि शिफारस करत फाईल पुढे आणली तर त्याची गय करणार नाही. तसेच, जर महापालिका कर्मचारी वेळेवर काम करणार नसतील आणि फिल्डवर जर वेळेत दिसले नाहीत तर त्यांच्यावर आजपासून कारवाई सुरू करण्यात येईल, असी तंबी देतानाच कोणत्याही नगरसेविकेचा पती जर काम घेऊन आला तर खपवून घेणार नाही, अशा सूचना  शुक्रवारी नाशिक महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱयांना दिल्या.

नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यावर तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय पदाधिकाऱयांसह कुणाचाही दबाव कर्मचाऱयांवर नसेल याची अधिकाऱयांना ग्वाही दिली. तसेच, शहरातील कामांची पाहणी मी स्वत: त्या ठिकाणी भेट देऊन करणार आहे. 31 मार्चपर्यंत नाशिककरांनी ओला, सुका आणि ई-कचरा वेगळा करायचा असून 50 मायक्रॉनपेक्षा जाडीच्या प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी करणार आहे, असेही सांगितले. दरम्यान, माझ्याकडे नागरिक, पदाधिकारी किंवा कंत्राटदार यांनी शिफारस फाईल फिरवू नये, ते काम अधिकारी-कर्मचाऱयाचे आहे, असे सांगतानाच कामात हलगर्जीपणा झाल्यास हयगय केली जाणार नाही, असा इशारा मुंढेंनी दिला आहे. तसेच, अधिकाऱयांना सूचना देताना सांगितले की, काम करताना संवेदनशिलता दाखवावी. शहराचे स्वास्थ्य, पर्यावरण टिकवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. त्यासाठी पार्किंगसाठी नवे धोरण आणणार आहोत. तसेच, शहराचा विकास करण्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना असल्याचेही तुकाराम मुंढे यांनी नमूद केले आहे.

Related posts: