|Friday, February 22, 2019
You are here: Home » क्रिडा » आशिया सांघिक बॅडमिंटनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात

आशिया सांघिक बॅडमिंटनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात 

अलोर सेतार, मलेशिया

भारतीय महिला संघाचे आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. शुक्रवारी झालेल्या लढतीत भारतीय महिलांना सिंधूने विजय मिळविला असला तरी इंडेनेशियाकडून पराभव स्वीकारावा लागला. पुरुष संघालाही उपांत्यपूर्व फेरीत चीनकडून पराभव स्वीकारावा लागला.

जपानविरुद्ध झालेल्या लढतीतही पीव्ही सिंधूने सामना जिंकला. पण उर्वरित सामने गमवावे लागले होते. त्याचीच पुनरावृत्ती इंडोनेशियाविरुद्धही झाली. सिंधूने फित्रियानी फित्रियानीवर 21-13, 24-22 अशी पहिल्या सामन्यात मात करून भारताला आघाडी मिळवून दिली होती. पण नंतरचे तीन सामने भारताला गमवावे लागल्याने त्यांचे आव्हान समाप्त झाले. दुहेरीत गेसिया पॉली व अप्रियानी रहायु यांनी अश्विनी पोन्नप्पा व सिक्की रेड्डी यांचा 21-5, 21-16 असा पराभव केला. तिसऱया सामन्यात हन्ना रामादिनीने प्रिया कुदरावल्लीचा 21-8, 21-15 असा तर दुहेरीच्या चौथ्या सामन्यात अँजिया शिट्टा अवांदा व महादेवी इस्तारानी यांनी सिंधू व संयोगिता घोरपडे यांचा 21-9, 21-18 असा पराभव केला.

पुरुष विभागातही भारताला चीनकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना उपांत्यपूर्व फेरीतच बाहेर पडावे लागले आहे.

Related posts: