|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा करासह पाणीपट्टी वाढीच्या हालचाली

मनपा करासह पाणीपट्टी वाढीच्या हालचाली 

प्रतिनिधी/सोलापूर

महापालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर आणि पाणीपट्टी वाढीच्या हालचाली पालिका प्रशासनाकडून सुरु असून मिळकत करासंदर्भात राज्यातील इतर पालिकांकडून माहिती मागवण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे सोलापूरकरांवर करवाढीची तलवार टांगती आहे.

महापालिकेच्या प्रत्येक अर्थसंकल्पात मिळकत कर व पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून देण्यात येतो. परंतु पदाधिकारी व नगरसेवकांकडून मात्र करवाढीच्या प्रस्तावास विरोध होतो. सध्या सोलापूरकरांना वर्षातील 365 दिवसांपैकी 100 दिवस पाणीपुरवठा करुनही पालिकेकडून वर्षाची 2700 रुपये पाणीपट्टी आकारली जाते.

पाणीपट्टी इतकी भरुनही शहरवासियांना वेळेवर व नियमित पाणीपुरवठा होईलच, याची खात्री नसते. सध्या सोलापुरात महापालिकेकडून आकारला जाणारा मिळकतकर हा इतर पालिकापेक्षा जास्त असल्याची चर्चा असते. आता आणखीन मिळकतकर वाढविण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांमध्ये मिळकतकराचे दर काय असल्याची माहिती प्रशासनाकडून मागविण्यात येत आहे. प्रशासनाकडून पालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर करण्यात येतो. स्थायीच्या मंजुरीनंतर महापालिकेचा अर्थसंकल्प 31 मार्च रोजी सर्वसाधारण सभेत मांडून मंजूर केला जातो.

गतवेळी भाजपला अर्थसंकल्प मांडण्यास विलंब झाला होता. प्रशासनाने सादर केलेल्या 900 कोटींच्या अर्थसंकल्पात वाढ करत भाजपने 1200 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला होता. दहा महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही अर्थसंकल्पापैकी फक्त 175 कोटींचे महसूली उत्पन्न प्रशासनाला मिळवता आले आहे, तर 135 कोटी एलबीटी व जीएसटी अनुदानातून मिळालेले आहेत.

जीआयएस सर्व्हेबाबत 15 फेब्रुवारीला बैठक

शहरातील मिळकतींची निश्चित संख्या शोधून पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी लाखो रुपये खर्चून पालिकेने जीआयएस सर्व्हेचा ठेका सायबर टेक या कंपनीला दिला. परंतु अनेक महिन्यांपासून हा सर्व्हे रखडलेला आहे. या प्रकरणाचा फैसला लावण्यासाठीच आयुक्तांनी यासंदर्भात 15 फेबुवारी रोजी बैठक आयोजित केली आहे. यासंदर्भात आयुक्त काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Related posts: