|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शांतीदूत साताऱयातच..

शांतीदूत साताऱयातच.. 

‘तरुण भारत’च्या लढय़ाला सातारकरांचे पाठबळ

प्रतिनिधी/ सातारा

गेल्या 18 वर्षापासून शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस मुख्यालयासमोर उभा असलेल्या कबुतराचा पुतळा गुरुवारी रात्री पोलिसांनी काढण्यास सुरुवात केली होती. ही माहिती ‘तरुण भारत’ला समजताच याबाबत तरुण भारतने उठाव करण्यास सुरुवात केली. अनेकांशी संपर्क साधला व या लढय़ाला सातारकरांनीही मोठे पाठबळ दिले, त्यामुळे अखेर हा शांतीदूत साताऱयातच राहणार असल्याचा खुलासा अखेर पोलिसांना करावा लागला.

गुरुवारी रात्री शांतीदुत म्हणून 18 वर्षापासून उभा असलेल्या कबुतराच्या पुतळ्यावर सातारकरही प्रेम करु लागले होते व हा शांतीदुत खऱया अर्थाने सातारकरही झाला होता, परंतु कुठे माशी शिंकली हे समजण्याआधीच पोलिसांनी कोणतीही पुर्वसुचना प्रसारमाध्यमांना न देता हा पुतळा काढण्याचे काम सुरु केले. बंदुकीच्या पुंगळ्या पासून तब्बल 750 किलो वजनाचा उभा करण्यात आलेला हा पुतळा अचानकपणे पोलीस का काढत आहेत याची कानकुन प्रसारमाध्यमांना लागली. तरुण भारत’ने यामध्ये आक्रमक भुमिका घेवून हा शांतीदुत आयजी नांगरे पाटील साहेब कोल्हापुरात घेवून निघालेत यावर टिकेची झोड उठवली, तर एस.पी. संदीप पाटलांचे फोन वारंवार खणखणु लागले. त्यामुळे पोलिसांचा प्लॅन काय होता व काय करणार आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना खुलासा करावा लागला. हा शांतीदुत दुसरी-तिसरीकडे न जाता येथेच प्रांगणात बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पोलीस मुख्यालय इमारतीचा हेरिटेज इमारतीचा फोटो सोशल मीडियामधून व्हायलर करुन हा कबुतर हेरिटेजमध्ये नाही म्हणून काढला की काय ? असे पुतळा काढण्यापाठीमागे नकळतपणे समर्थन करणारे फोटो टाकले.

परंतु हा पुतळा आयजी नांगरे-पाटील साहेब कोल्हापुरला घेवून जाण्याच्या प्रयत्नात होते, परंतु तरुण भारत’ने उगवलेला अवाज व सातारकरांनी दिलेली साथ, जिल्हाधिकाऱयांना शिवसेना, आप या पक्षांनी दिलेली निवेदने या सर्वांमधून विषय तापत असल्याचे लक्षात येताच पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी प्रसिध्दीपत्रक काढून हा शांतीदुत साताऱयातच राहणार फक्त थोडीसी जागा बदलत असल्याचे जाहीर केले. सध्या हा पुतळा पोलीस राखीव दलाच्या इमारतीत ठेवण्यात आला आहे. लवकरच हा पुतळा पोलीस मुख्यालय इमारतीच्या ग्राउंढडवर झेंडय़ाच्या समोर पुन्हा दिमाखात उभा राहणार आहे.

पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; पण खोपडेंचे नाव ?

हा पुतळा काढण्यामागचे कारण सांगताना पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी वाहतुकीला अडथहा होत असल्याचे सांगितले खरे. परंतु आतापर्यंत चार पोलीस अधिक्षक येऊन गेले त्यांना कोणालाच वाहतुकीला अडथळा होतोय असे जाणवले नव्हते परंतु हा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार असल्याचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले, पण त्याखाली खोपडेंचे नाव राहणार का ? हा प्रश्न मात्र अनुउत्तरीतच राहीला आहे.

जागा बदलली… उद्देश तोच

या पुतळ्या समोर असणारा झेंडा काही दिवसांपुर्वी काढला व तो मैदानात बसवला आता पुतळा काढुन तो ही या झेंडय़ासमोर बसवणार आहे. केवळ जागा बदलली पण शांततेचा उद्देश तोच आहे असे सांगतानाच एस.पी. संदिप पाटील यांनी आय.जी. विश्वास नांगरे-पाटील व पोलीस दलावर होणारी टीकाटीप्पणीची चर्चा क्षणात बंद पाडली. सोशल मीडियालाही शांत केले व शांतीदुत साताऱयातच ठेवून सातारकरांचे प्रेम ही मिळवले, अशा पध्दतीने एकाच निशानात तीन तीर मारले.

Related posts: