|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » डी. डी. कोसंबी विचार महोत्सव 13 पासून

डी. डी. कोसंबी विचार महोत्सव 13 पासून 

प्रतिनिधी/ पणजी

11 वी डी. डी. कोसंबी विचार महोत्सव मंगळवार दि. 13 फेब्रुवारी 2018 पासून कला अकादमीतील पं. दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात सुरु होणार असून तो चार दिवस चालणार आहे. त्यासाठी चार नामवंत व्यक्तींना गोव्यात आमंत्रण दिल्याची माहिती कला आणि संस्कृती खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक संचालक अशोक परब, मध्यवर्ती ग्रंथालयाचे क्युरेटर कार्लुस फर्नांडिस हजर होते.

पहिल्या दिवशी शुभारंभ झाल्यावर ज्येष्ठ नाटय़लेखक, दिग्दर्शक कादंबरीकार व वास्तूशिल्पकार मकरंद साठे यांचे पहिले व्याख्यान असणार आहे. जागतिकीकरणाच्या काळातील राष्ट्रीयता, संस्कृती आणि रंगभूमी या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.

दुसऱया दिवशी बुधवार दि. 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान, ‘21 व्या शतकातील शिक्षणातला विरोधाभास’ हा विषय मांडण्यासाठी व स्टोरी ऑफ फाऊंडेशन या संस्थेच्या संचालक श्रीमती जया रामचंदानी यांना बोलावण्यात आले आहे.

दि. 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता ब्रिटनमधील भारतीय उद्योजक लॉर्ड करण बिलीमोरा हे युरोपीयन युनियनच्या भवितव्यावर पारसी दृष्टीक्षेप हा विषय मांडणार आहेत. ब्रेकझीट नंतर भारत आणि ब्रिटन संबंधावर भाष्य करणार आहेत.

या व्याख्यान माळेतील चौथे आणि शेवटचे पुष्प प्रसिद्ध चित्रकार लेखक तथा क्ष-किरण तज्ञ सुधीर पटवर्धन आजची कला काय आहे हा विषय मांडणार आहेत.

दरवर्षी किमान पाच तरी नामवंत हस्तींना व्याख्यानमालेत आमंत्रण देण्यात येते पण यंदा चारच तज्ञांना बोलावण्याचे सांगताना तयारी करण्यास वेळ मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. पाचवी व्याख्याता मलायका यांनी आयत्या वेळाला गोवा भेट रद्द केल्याने फक्त चारच व्याख्याते राहिल्याचे संचालक पिळर्णेकर यांनी मान्य केले.

2007 साली दामोदर धर्मानंद कोसंबी याची 100 वी जयंती गोवा सरकारने साजरी केली व 2008 पासून त्यांच्या नावे डी. डी. कोसंबी व्याख्यानमाला सुरु झाली. यंदाचे हे 11 वर्ष असून गेल्या 10 वर्षाच्या व्याख्यानाच्या सीडी विक्रीसाठी उपलब्ध असतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Related posts: