|Saturday, May 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अट्टल दरोडेखोर जेरबंद

अट्टल दरोडेखोर जेरबंद 

विजापूर पोलिसांची कारवाई : दोन ठिकाणी  संशयितरित्या फिरणाऱया 6 जणांना अटक

विजापूर/वार्ताहर

विजापूर शहरात संशयितरित्या फिरणाऱया 6 दरोडेखोडरांना पोलिसांनी अटक केली. जमखंडी रस्त्यावरील कालेबाग क्रॉसजवळ पाचजणांना तर इंडी तालुक्यातील आरटीओ नाक्याजवळ एकाला अटक करून ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवाया शुक्रवारी पहाटे करण्यात आल्या. सदर संशयितांकडून 412 ग्रॅम सोन्याचे दागिने, 115 ग्रॅम चांदी, रोख रक्कम तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यातील पहिली कारवाई विजापूर शहरातील जमखंडी रस्त्यावर करण्यात आली. यामध्ये मदस्सर उर्फ मुद्दू अब्दूलहमीद पठाण (वय 23 रा. शक्तीनगर), अजीम उर्फ सोयब अब्दुलगणी बेपारी (वय 20 रा. सोलापूर नाका), सोहल उर्फ बडासोहेल युसूफ बिडीवाले (वय 20 रा. शक्तीनगर), लालसाब उर्फ लाल्या अस्पाक हवालदार (वय 19 रा. खाजा अमिन दर्गा), रमेश उर्फ गुड्डय़ा सन्नीरप्पा देवरहिप्परगी (वय 25 रा. कोंचीरकोरवार गल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांच्याकडून चोरीचा ऐवज व दरोडय़ासाठी वापरणारे साहित्य जप्त केले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, शुक्रवारी पहाटे हे पाच संशयित दरोडेखोर जमखंडी रस्त्यावरील कालेबाग क्रॉसजवळ संशयितरित्या फिरत होते. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपण दरोडा घालण्याच्या प्रयत्नात होतो. तसेच आम्ही विविध ठिकाणी दरोडा घातल्याची कबुली दिली. गेल्या वर्षी अथणी रस्त्यावरील सिद्धेश्वर कॉलनीमध्ये बंद घरात दरोडा टाकून यात सोन्या-चांदीची चेन, चांदीचे भांडे, एलईडी, इस्त्राr व रोख सहा हजार रुपये, त्याचप्रमाणे चार महिन्यापूर्वी शिंदे कॉलनीमध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे ब्रेसलेट व रोख 48 हजार तसेच अडीच महिन्यापूर्वे केएसआरटीसी कॉलनीमधील एका घरात सोन्याच्या वस्तुंवर डल्ला मारल्याचे दरोडेखोरांनी कबूल केले.

तसेच पोलिसांनी दरोडेखारांकडून 210 गॅम साने, 115 ग्रॅम चांदीचे दागिने व  दरोडय़ासाठी वापरणारे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये तलवार, चाकू, लोखंडी रॉड, दोरखंड, मिरची पूड, मंकीकॅप आदी साहित्यांचा समावेश आहे. डीवायएसपी डी. अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय भीमनगौडा बिरादार, पीएसआय मुशाफिर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेची नोंद गांधी चौक व एपीएमसी पोलिसात झाली आहे. पोलीसप्रमुख कुलदीपकुमार जैन यांनी या कारवाईबद्दल पोलीस अधिकाऱयांचे कौतुक करून अधिकाऱयांना योग्य बक्षीस देण्यात येणार असल्याचे सांगितले.

सांगोल्याचा सोनसाखळी चोरटा अटकेत

येथील सोनसाखळी चोरीचा उलगडा करण्यात विजापूर पोलिसांना यश आले आहे. शुक्रवार 9 रोजी पहाटे इंडी तालुक्यातील झळकी जवळील आरटीओ तपासणी नाकानजीक एकजण संशयितरित्या फिरत होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सोनसाखळी चोरीची कबुली दिली. महमद अलियास इरफान सलीम इराणी (वय 25 रा. सांगोला, सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून सुमारे 202 ग्रॅमचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आली आहेत. दागिन्यांची किंमत सुमारे 6 लाख इतकी आहे.

येथे एक वर्षांपासून सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांवर यावर आळा घालण्याचे मोठे दडपण आले होते. तसेच याची गंभीर दखल घेऊन पोलीसप्रमुख कुलदीपकुमार जैन यांनी यासाठी सीपीआय सुनील कांबळे व रविंद्र नाकोडी यांच्या नेतृत्त्वाखाली दोन पथकांची नेमणूक केली होती. त्यानुसार या पथकाने गत दोन महिन्यापासून याचा तपास सुरू केला होता.

दरम्यान शुक्रवारी पहाटे झळकी आरटीओ तपासणी नाकाजवळ महमद इराणी संशयितरित्या फिरत होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. पण त्याने चौकशी दरम्याने योग्य उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण जलनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत 2, आदर्शनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत 2 व गांधी चौक पोलीस स्थानकाच्या हद्दीत 3 ठिकाणी सोनसाखळी चोरल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी महमद इराणीकडून 202 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

एकूण सात प्रकरणील गुह्यांचा शोध लागला असून पोलीसप्रमुख कुलदीपकुमार जैन यांनी अधिकाऱयांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. तसेच या प्रकरणात अजून किती आरोपी सामिल झाले आहेत. याचा तपास पोलीस करीत आहेत.

Related posts: