|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » एफ-वनमध्ये आता ग्रिड गर्ल्सऐवजी ग्रिड किड्स

एफ-वनमध्ये आता ग्रिड गर्ल्सऐवजी ग्रिड किड्स 

वृत्तसंस्था/ लंडन

जागतिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या एफ-वन मोटार रेसिंग क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून स्पर्धेच्या विविध टप्प्यात तसेच स्पर्धेनंतर चालकांसमवेत महिला मॉडेल्सना संधी दिली जात असे पण आता या क्षेत्रातून महिला मॉडेल्सऐवजी यापुढे लहान मुलांना संधी देण्यात येणार आहे.

एफ-वन मोटर रेसिंग संघटनेतर्फे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमावेळी महिला मॉडेल्सना वगळण्यात आले. आता यापुढे लहान मुलांना संधी दिली जाईल, असे व्यावसायिक विभागाचे संचालक सिन ब्रॅचेस यांनी सांगितले.