|Thursday, November 15, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘प्रभो शिवाजी राजा’मध्ये शिवरायांचा जयघोष करणारे गीत

‘प्रभो शिवाजी राजा’मध्ये शिवरायांचा जयघोष करणारे गीत 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अलौकिक आणि दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व. त्यांचा धगधगता जीवन प्रवाह मोजक्या शब्दात मांडणे कठीणच आहे. त्यांचे पोवाडे, ओव्या आजही प्रत्येक घराघरात छत्रपतींचा गौरवशाली इतिहास आपल्याला स्वातंत्र्य आणि स्वाधीनतेचा परिपाठ शिकवतो. शिवाजी महाराजांची हीच जीवनगाथा 16 फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱया ‘प्रभो शिवाजी राजा’ या ऍनिमेशनपटातून लोकांसमोर येणार आहे. गणराज असोसिएट्स प्रस्तुत तसेच इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मीपॅक निर्मित या ऍनिमेशनपटात शिवरायांचा जयघोष करणारे कणखर बांधा हे गाणे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठय़ा पडद्यावर आणणाऱया या सिनेमातील हे गाणे महाराजांच्या पराक्रमाची अनुभूती देते. गायक श्रीरंग भावे यांच्या शास्त्राrय सूरातून अवतरलेले हे गाणे प्रकाश राणे यांनी लिहिले असून स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या संगीताचे संस्कार त्याला लाभले आहेत. महाराजांची गाथा संक्षिप्तरुपात मांडणाऱया या गाण्याला लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. या गाण्याबरोबरच आणखी सहा गाणी या चित्रपटात असून शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, नंदेश उमप या गायकांची गाणीदेखील या चित्रपटात आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.

 

Related posts: