|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » मोदींनी दिला ‘6आर’चा नवा विकासमंत्र

मोदींनी दिला ‘6आर’चा नवा विकासमंत्र 

ऑनलाईन टीम / दुबई

दुबईमध्ये आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला ‘6 आर’ चा नवा विकासमंत्र दिला आहे. या काळात यशस्वी होण्यासाठी रिडय़ुस, रियुज, रिसायकल, रिकव्हर, रीडिझाईन व रिमॅन्युफॅक्चर हे सहा महत्त्वपूर्ण पावले टाकावी लागणार आहेत.

यावेळी मोदी म्हणाले, वर्ल्ड गव्हमेंट समिटमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून मला निमंत्रित केले, ही माझ्यासाठीच नव्हे; तर देशातील सव्वाशे कोटी नागरिकांसाठी अभिमानास्पद बाब आहे. संयुक्त अर अमिरामध्ये 33 लाख भारतीयांना आपलेपणा मिळाला आहे. यासाठी भारत आपला कृतज्ञ आहे. तंत्रज्ञानाच्या योग्य वापरासाठी दुबई हे जगासाठी अप्रतिम उदाहरण आहे. तंत्रज्ञानाने वाळवंटाचा कायापालट केला आहे, हा एक चमत्कारच आहे. रिडय़ुस, रियुज, रिसायकल, रिकव्हर, रीडिझाईन व रिमॅन्युफॅक्चर या सहा पावलावर तुम्ही चालले, की तुम्ही ज्या ठिकाणी पोहचाल, ते ठिकाण तुमच्यासाठी रिजॉईस म्हणजेच आनंदाचे असेल, असे ते म्हणाले.