|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काश्मीर सदैव भारताचेच राहणार : फारुख अब्दुल्ला

काश्मीर सदैव भारताचेच राहणार : फारुख अब्दुल्ला 

श्रीनगर

 काश्मीर भारताचा भाग होता आणि सदैव राहणार असल्याचे विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. जगातील कोणतीही शक्ती काश्मीरला भारतापासून वेगळी करू शकत नसल्याचे उद्गार जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काढले. अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे आमदार अकबर लोण यांनी शनिवारी विधानसभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. अब्दुल्ला यांनी याप्रकाराबद्दल रविवारी प्रतिक्रिया व्यक्त केली. लोण यांचे ते वैयक्तिक मत असून पक्षाचे त्याच्याशी कोणतेही देणेघेणे नाही. काश्मीर भारताचा हिस्सा होता आणि कायमच राहणार असल्याचे फारुख यांनी म्हटले. सुंजवान सैन्यतळावरील हल्ल्यादरम्यान विधानसभेच्या कामकाजावेळी भाजपने रोहिंग्या मुस्लिमांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचबरोबर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या होत्या. भाजप आमदारांच्या विरोधात नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोण यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. हे माझे वैयक्तिक मत असून यामुळे कोणालाही अडचण होईल, असे वाटत नसल्याचे लोण यांनी म्हटले होते.