|Friday, November 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शशी थरूर यांनी केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शशी थरूर यांनी केले कौतुक 

नवी दिल्ली

 काँग्रेस खासदार आणि माजी विदेश राज्यमंत्री शशी थरूर यांनी एका मुलाखतीत मोदी सरकारचे मोठे कौतुक केले आहे. सर्जिकल स्ट्राइक आणि डोकलाम वाद यासारख्या विषयांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश धोरणाची थरूर यांनी प्रशंसा केली. त्याचबरोबर त्यांनी त्रुटींकडे देखील लक्ष वेधले आहे. पंतप्रधान मोदींनी भारताच्या विदेश धोरणात गतिमानता आणली आहे. परंतु शेजारी देशांबद्दलच्या धोरणात स्थैर्य नसल्याचे सांगत थरूर यांनी पाकिस्तान आणि चीनसोबतच्या भारताच्या संबंधांकडे इशारा करत डोकलाम वादाचा उल्लेख केला. मोदींनी विदेश धोरणात अधिक ऊर्जा ओतली आहे. ते अथक प्रवास करतात आणि हे खरोखरच चांगले आहे. ते जेथे जातात, तेथे त्यांची छाप पडत असल्याचे गौरवोद्गार थरूर यांनी काढले.  हा सकारात्मक बदल मानला गेला पाहिजे.  डोकलाम वादात चीनला 200 मीटर मागे हटावे लागल्याने तो भारताचा विजय मानला गेला पाहिजे असे थरूर म्हणाले.

सप्टेंबर 2016 मध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील सर्जिकल स्ट्राइक देखील एक मोठा विजय आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर दहशतवाद वाढला आहे. त्याचप्रमाणे सीमेपलिकडून घुसखोरी करणाऱयांच्या खात्म्याची संख्या देखील वाढली आहे. स्वतःच्या नागरिकांसोबत प्रामाणिक राहणे हे कोणत्याही भारतीय सरकारचे कर्तव्य असल्याचे उद्गार थरूर यांनी काढले.

Related posts: