|Sunday, July 21, 2019
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रकुल-अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी सराव शिबिराची घोषणा

राष्ट्रकुल-अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी सराव शिबिराची घोषणा 

33 खेळाडूंची निवड, बेंगळूरातील साई केंद्रात रंगणार शिबिर

वृत्तसंस्था/ बेंगळूर

आगामी सुलतान अझलन शाह चषक हॉकी व राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने सराव शिबिरासाठी 33 खेळाडूंची घोषणा रविवारी केली. बेंगळूरातील साई केंद्रात या सराव शिबिराला मंगळवारपासून प्रारंभ होईल.

अलीकडेच न्यूझीलंडमध्ये झालेल्या चौरंगी हॉकी मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने बलाढय़ बेल्जियम, न्यूझीलंड, जपान संघाना पराभवाचा धक्का दिला होता. आता, पुढील महिन्यात 3 ते 10 मार्च दरम्यान सुलतान अझलन शाह चषक हॉकी तर 4 एप्रिलपासून ऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रकूल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर या सराव शिबिरात नवी रणनीति, पेनल्टी कॉर्नरवर विशेष भर देण्यात येणार आहे.

भारतीय संघ –

गोलरक्षक – आकाश चिकटे, सुरज करकेरा, पी.आर. श्रीजेश, क्रिशन पाठक

बचावफळी – हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, दिप्सेन तिर्की, वरुण कुमार, रुपिंदरपाल सिंग, बिरेंद्र लाक्रा, सुरेंद्र कुमार, सरदार सिंग, गुरिंदर सिंग, निलम सेज.

मध्य फळी – मनप्रीत सिंग, चिंगलसेना सिंग, एस. के. उथाप्पा, सुमीत, कोथाजीत सिंग, सतबीर सिंग, निलकांत शर्मा, सिमरनजीत सिंग, हरजीत सिंग.

आघाडी फळी – एस.व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, गुरजंत सिंग, रमणदीप सिंग, अरमान कुरेशी, अफ्फान युसूफ, तलविंदर सिंग व सुमित कुमार.