|Sunday, January 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » आता पाठवा व्हॉट्स ऍपद्वारे पैसे

आता पाठवा व्हॉट्स ऍपद्वारे पैसे 

ऑनलाईन टीम / मुंबई

भारतातील लोकप्रिय मॅसेजर ऍप व्हॉट्स ऍपवर आता रुपयांची देवाण-घेवाण करता येणार आहे. डिजीटल इंडियाकडे वाटचाल करणाऱ्या  भारतात अजून एका ऍपची भर पडली आहे.

ताबडतोब संदेश वहन करणाऱ्या  व्हाट्स ऍपला आता नॅशनल पेमेंट कॉर्पेरेशन ऑफ इंडियाकडून यूपीआय वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. हाईक, पेटीएम यासारखे यूपीआयद्वारे व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून रुपयांची आवक जावक करता येणार आहे. ही सुविधा सर्व ग्राहकांसाठी मोफत असेल, पण सध्या या ऍपची चाचणी प्रक्रिया सुरू असल्या कारणाने आता फक्त बीटा व्हर्जनसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. व्हाट्स ऍपसंदर्भात वेळोवेळी माहिती देणाऱया ऍटबीटाइंफो यावर यूपीआयबाबत माहिती देण्यात आली.

व्हाट्स ऍपच्या नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अपडेटेट नवीन व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. यामधील सेटिंगमध्ये एक नवीन टॅब यूपीआयचा ऍड झालेले दिसेल. या ठिकाणी आपण बँक अकाऊंटचा वापर करून यूपीआयशी जोडू शकतो. येथे नवा ऑथेंटिकेशन पासवर्ड मिळेल, त्यानंतर आपल्या बँकेचे नाव निवडून रुपयांची देवाण-घेवाण करण्यास सुरूवात करू शकतो. पण या सुविधेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही वापरकर्त्यांकडे अपडेटेड व्हर्जन पेमेंट फिचर असणे आवश्यक आहे.

 

Related posts: