|Sunday, January 20, 2019
You are here: Home » क्रिडा » हरिकृष्णाचे सर्बियन मैत्रिणीशी ‘चेकमेट’,

हरिकृष्णाचे सर्बियन मैत्रिणीशी ‘चेकमेट’, 

3 मार्चला हैदराबादमध्ये होणार विवाह

वृत्तसंस्था/ हैदराबाद

भारताचा अव्वल बुद्धिबळपटू पी. हरिकृष्णचे लवकरच ‘चेकमेट’ होणार असून सर्बियाची बुद्धिबळपटू नादाशी त्याचा विवाह होणार आहे. 3 मार्च रोजी हैदराबादमध्ये नोवोटेल येथे रात्री 8 वाजता हा विवाहसोहळा होणार आहे.

कनि÷ स्तरावरील स्पर्धांपासून हरिकृष्ण व नादाची ओळख असून मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर विवाह करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने त्यांचा विवाह निश्चित करण्यात आला आहे. हरीचे वडील नागेश्वरराव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नामवंत सेलेब्रिटी व राजकीय व्यक्तींना याआधीच निमंत्रणपत्रिका पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

31 वषीय हरी आंध्रमधील गुंटूरचा रहिवासी असून 2001 मध्ये तो भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला होता. त्यावेळी हा विक्रम होता. पण सध्या परिमार्जन नेगीने त्याच्या कमी वयात ग्रँडमास्टर नॉर्म पटकावल्याने त्याच्या नावावर हा विक्रम आहे. 2001 मध्येच हरीने राष्ट्रकुलचा चॅम्पियन बनला तर 2004 मध्ये कनि÷ वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. त्यानंतर 2011 मध्ये तो आशियाई वैय&िक्तक चॅम्पियन झाला होता. 2000 ते 2012 या कालावधीत त्याने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचे सात वेळा प्रतिनिधित्व केले. 2010 मध्ये विश्व सांघिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले. त्याने सांघिक स्पर्धांत एक सुवर्ण, 2 रौप्य व वैयक्तिक कांस्य मिळविले आहे.

Related posts: