|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » क्रीडाक्षेत्रात सातारकरांचा डंका

क्रीडाक्षेत्रात सातारकरांचा डंका 

जिल्हय़ात 7 खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार जाहीर,

प्रतिनिधी/ सातारा

क्रीडाक्षेत्रात राज्यस्तरावर सातारा जिल्हय़ाने उज्वल परंपरा कायम राखली. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत क्रीडामंत्र्यांनी खेळात नेत्रदिपक कामगिरी करणाऱया खेळाडूंना शिवछत्रपती राज्यक्रिडा पुरस्कार जाहीर केले. यामध्ये सातारच्या ललिता बाबर, शिवराज ससे, अशिष माने, सायली शेळके, स्नेहल शेळके, एकता शिर्के व सतिश कदम यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण राज्यपालांच्या हस्ते 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मानाचे समजले जाणारे शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्काराची घोषणा सोमवारी मुंबई येथे झाली. यामध्ये आंतराष्ट्रिय किर्तीची धावपट्टू ललिता शिवाजी बाबर (धावणे) 2016-17, शिवराज संदीप ससे (रायफल शुटिंग) 2014-15, एकता दिलीप शिर्के (तिरंदाजी 2015-16), सायली राजेंद्र शेळके व स्नेहल राजेंद्र शेळके या दोन्ही बहिणींनी (रोईंग 2016-17), आशिष शरद माने (एव्हरेस्टवीर 2014-15) व सतिश कृष्णा कदम (खाडी-समुद्र पोहणे 2015-16), या खेळाडूंना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. खेळाडूंना ब्लेझर, गौरवपत्र, सन्मानचिन्ह व 1 लाख रूपये रोख बक्षिस गौरविण्यात येणार आहे.

या खेळाडूंचे अभिनंदन पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, उपसचिव राजेंद्र पवार, व सातारा जिल्हा क्रिडा अधिकारी सुहास पाटील यांनी केले.

 

Related posts: