|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘शांतीदूत’ त्याच जागेवर बसणार

‘शांतीदूत’ त्याच जागेवर बसणार 

प्रतिनिधी/ सातारा

गेल्या चार दिवसांपासून पोलीस मुख्यालयासमोरील हटवण्यात आलेल्या शांतीदूत कबुतराच्या पुतळयाप्रकरणी लोकभावना तीव्र झाल्यामुळे व ‘तरुण भारत’ने या लोकभावनेला एक वज्रमुठीची ताकत बनवून प्रशासनाच्या डोळय़ात झणझणीत अंजन घातल्यामुळे अखेर हा शांतीदूत होता तिथेच बसवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

 दरम्यान, तरुण भारतच्या लढय़ाला यश आल्याच्या प्रतिक्रिया अनेक सातारकरांकडुन व्यक्त करण्यात आल्या. गेल्या 18 वर्षापासुन पोलीस मुख्यालयासमोरील चार दिवसांपुर्वी दिमाखात उभा असलेला शांतीदूत कबुतराचा पुतळा चार दिवसांपुर्वी कोणतेही कारण नसताना पाडून टाकण्यात आला होता. हा पुतळा हटवताना तरुण भारतने याबाबत वृत्त प्रसिध्द करून सातारकरांच्या भावनेलाच साद घातली व पोलीस खात्यातील आय. जी. विश्वास नांगरे- पाटील हा पुतळा घेवून कोल्हापूरला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सातारकारांची वज्रमुठ आवळली गेली. जिल्हाधिकाऱयांना तातडीने निवेदन देण्यात आले. प्रसारमाध्यमांनाही आवाज उठवल्यावर पोलिसांना पुतळा का हटवला हे सांगताना अनेकदा खोटे बोलावे लागले. कधी वाहतुकीला अडथळा होतोय असे सांगण्यात आले तर कधी पुतळा आतील मैदानावर बसणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र लोकभवना दिवसेंदिवस तीव्र होवू लाग ल्याने अखेर पोलिसांनी लोकभावनेचा आदर राखून हा पुतळा होता तिथेच बसवण्यात येणार असल्याचे पुन्हा एकदा जाहीर करून खोटे बोलण्यास आता पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रकरणाचा शेवट करताना देखील पोलिसांनी इमारतीचे डागडुजीचे काम काढण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून हा पुतळा काढला आता तो पुन्हा होता तिथेच बसवणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळवले खरे.

मात्र नेहमीच चोरांनी कितीही खोटे बोलले तरी त्यांच्याकडून खरे वधवून घेण्याची ताकत असलेल्या पोलिसांना जेव्हा जनताच आरोपीच्या पिंजऱयात उभी करते तेंव्हा मात्र एक खरं लपवण्यासाठी किती वेळा खोटे बोलावे लागते, याचा प्रत्यय पोलीस प्रशासनाला आला. पुलाखालुन पाणी खुप गेले, मात्र सातारकरांना त्यांचा लाडका शांतीदूत परत मिळाला यापेक्षा सातारकारांना आणखी काय हवे.

Related posts: