|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात आज महाशिवरात्री उत्सव

राज्यात आज महाशिवरात्री उत्सव 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात महाशिवरात्री उत्सव भावभक्तीपूर्ण साजरा करण्यात येणार आहे. आज होणार असलेल्या या उत्सवासाठी राज्यातील सारी शिवमंदिरे सज्ज झाली आहेत.

आज पहाटेपासूनच राज्यातील शिवमंदिरात शिव पिंडिकेवर दुग्धाभिषेक सुरु होईल. हरवळेचे श्री रुद्रेश्वर मंदिर, नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिर, ओल्ड गोवा येथील श्री गोमंतेश्वर, मंगेशी येथील श्री मंगेश, नागेशी येथील श्री नागेश मंदिर, तांबडीसुर्ल येथील शिव मंदिर, तसेच ताळगाव येथील श्री महादेव मंदिर, एवढेच नव्हे तर प्रत्येक गावागावात असलेल्या शिवमंदिरात आज सकाळपासून महाभिषेक करण्यासाठी भक्तांची एकच गर्दी उसळणार आहे. राज्यातील सर्व शिवमंदिरात आज भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

हरवळे सांखळी येथील रुद्रेश्वर मंदिर व धबधबा परिसर हे तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे इथे आज हजारोंच्या संख्येने भाविक मंडळी रुद्रेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावतील. महाशिवरात्रीच्या निमित्ताने राज्यातील महत्त्वाच्या शिवमंदिराकडे भक्तांचा येणारा पूर लक्षात घेऊन सर्वठिकाणी वाहतूक पोलीस व इतर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. राज्यातील विविध शाळांनी आज महाशिवरात्रीनिमित्त सार्वजनिक सुट्टी दिली आहे.

Related posts: