|Sunday, June 16, 2019
You are here: Home » leadingnews » महाशिवारात्रीचा देशभर उत्साह

महाशिवारात्रीचा देशभर उत्साह 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. हरिद्वारपासून उज्जैनपर्यंत. सर्वत्र हरहर महादेवचा गजर दुमदुमत आहे.

सकाळी उज्जैनच्या महाकालेश्वरावर भस्माचा अभिषेक करण्यात आला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱया महाकालेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ लागली. शिवभक्तांचा बम बम भोले आणि ओम नमः शिवायचा गजर साऱया देशात सुरु आहे.तर राज्यातही महाशिवारात्रीचा उत्साह पहायला मिळत आहे. औरंगाबादमधील घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासून भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. तर पहाटे विधीवत दुग्धाभिषेक सोहळा पार पडला. बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे. तर मुंबईचं बाबुलनाथ मंदिर आणि पुण्याच्या भीमाशंकर मंदिरातही भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते आहे. रात्री पासून देशभरात भक्तीमय वातावरण दिसून येत आहे.