|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » भारता इतकेच माझे पाकिस्तानवर प्रेम : मणिशंकर अय्यर

भारता इतकेच माझे पाकिस्तानवर प्रेम : मणिशंकर अय्यर 

ऑनलाईन टीम / कराची :

‘भारतावर माझे जेवढे प्रेम आहे तेवढच प्रेम पाकिस्तानवरही आहे,’असे वक्तव्य काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारायचे असेल तर दोन्ही देशांत चर्चा व्हायला पाहिजे, असे सांगतानाच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून होणाऱया प्रयत्नांचे त्यांनी कौतुकही केलेआहे.

कराचीत एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मणिशंकर अय्यरांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. ‘कोणत्याही अटी- शर्तीविना चर्चा करत राहणे हाच भारत – पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याचा एकमेव पर्याय आहे. चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न योग्यच आहे.पण नवी दिल्लीकडे हे धोरण नाही’,अश टीकाही त्यांनी केली. ‘भारत- पाकिस्ताने एकत्र बसून चर्चेद्वाररे प्रश्न सोडविणे ही काळाची गरज आहे,असेही त्यांनी सांगितले.

 

Related posts: