|Sunday, January 20, 2019
You are here: Home » Top News » धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना 54 लाख रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची माहितीआहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकाऱयांनी ऊर्जा विभागाला सादर केला आहे.

मंत्रालयात विषप्राशन करून उपचारादरम्यान धर्मा पाटलांचा मृत्यू झाला होता. शेतमाला योग्य मोबदला न मिळाल्याने पाटलांनी हे पाऊल उचलले होते. मात्र त्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग आली आहे. पाटील यांच्या पाच एकर जमिनीसाठी 54 लाख रुपये मोबदला देण्याची शिफारस अहवालात करण्यात आली असून पूर्वीचा पंचनामा रद्द करुन रोपांच्या संख्येनुसार सानुग्रह अनुदान ग्राह्य धरण्यात येणार आहे.

 

 

Related posts: