|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » मुंढेंचा झटका ; महापालिकेतून देवांचे फोटो हटवले

मुंढेंचा झटका ; महापालिकेतून देवांचे फोटो हटवले 

ऑनलाईन टीम / नाशिक  :

नाशिक महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेतील देवी देवतांचे फोटा हटवण्याचे आदेश दिले आहे. मुंढेंची अवघ्या काही दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेत पारदर्शी कारभार करण्यावर भर देणाऱया मुंढेंनी महापालिकेच्या सर्व विभागात साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी साफसफाई करण्यास मुंढेंनी सांगितले.साफसफाईच्या या मोहिमेत जुनी जळमट, फाईल्सवरची धुळ झटकण्यात आली.त्यानंतर देवांचे फोटो काढण्याच्या सूचना करत आचार आणि विचारांची साफसफाई झाली पाहिजे,अशी प्रतिक्रिया मुंढेंनी दिली.त्याचबरोबर महापालिकेतील इतर अधिकाऱयांना माध्यमांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला.

 

 

Related posts: