|Sunday, January 20, 2019
You are here: Home » leadingnews » देवेंद्र फडणवीस गुन्हेगारीत श्रीमंत, तर चंद्रबाबू नायडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस गुन्हेगारीत श्रीमंत, तर चंद्रबाबू नायडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री 

ममता बॅनर्जी गरीबांच्या यादीत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

देशात सर्वात जास्त गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली आहे, तर श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे अव्वल ठरले आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) संस्थेने ही माहिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची धुराही फडणवीस सांभाळत आहेत.

निवडणुकीत दिलेल्या प्रतीज्ञा पत्राच्या अभ्यासानुसार ‘एडीआर’ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये देशातील 29 राज्यांचे मुख्यमंत्री व दोन केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री महोदयांचा समावेश आहे. ‘एडीआर’ने जाहीर केलेल्या श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याचे नाव नाही. यात सहा कॉंग्रेसचे, तर इतर टीडीपी, बीजेडी व एसडीएफचे मुख्यमंत्री आहेत. देशातील 31 पैकी 11 मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारीचे खटले सुरू आहेत, तर त्यातील 8 जणांविरोधात गंभीर गुन्हय़ांची नोंद आहे.

सर्वात जास्त गुन्हे असलेले मुख्यमंत्री

‘एडीआर’ च्या रिपोर्टमध्ये माहिती जाहिर केल्या प्रमाणे,

-देवेंद्र फडणवीस (भाजपा, महाराष्ट्र) 22 गुन्हे.

-पिनाई विजयन (सिपीआय(एम), केरळ) 11 गुन्हे.

-रघुवरण दास (भाजपा, झारखंड) 08 गुन्हे.

-अमरिंदर सिंह (काँग्रेस, पंजाब) 04 गुन्हे.

-योगी आदित्यनाथ (भाजपा, उत्तरप्रदेश) 04 गुन्हे.

-चंद्रबाबू नायडू (टीडीपी, आंध्रप्रदेश) 03 गुन्हे.

-अरविंद केजरीवाल (आप, दिल्ली) 03 गुन्हे.

-के. चंद्रशेखर राव (टीआरएस, तेलंगणा) 02 गुन्हे.

-वी. नारायण सामी (काँग्रेस, पुद्दुचेरी) 02 गुन्हे.

-मेहबूबा मुफ्ती (पीडीआय, जम्मू-कश्मिर) 1 गुन्हा.

-नितीश कुमार (जेदयू, बिहार) 1 गुन्हा.

 

सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

देशातील सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून चंद्रबाबू अव्वल स्थानी आहेत. यांच्याकडे 177 कोटी रूपयांची संपत्ती आहे. अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांच्याकडे 129.58 कोटींची संपत्ती असून, हे दुसऱया क्रमांकावर आहेत. तिसऱया क्रमांकावर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह विराजमान आहेत. यांच्याकडे 48.31 कोटी रूपयांची संपत्ती आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे 15.15 कोटी रूपयाची संपत्ती आहे व मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा 14.50 कोटी संपत्ती असून, अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.

गरीब मुख्यमंत्री

सर्वात कमी संपत्ती त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नावे आहे. माणिक सरकार यांच्याकडे 26 लाख रूपयाची संपत्ती आहे. यांच्याकडे स्वतःची गाडी व घर अद्यापही नाही. गरीब मुख्यमंत्र्यांच्या यादीत दुसऱया क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असून, यांच्याकडे 30 लाखांची संपत्ती आहे. जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या तिसऱया क्रमांकावर आहेत, त्यांच्याकडे 55.96 लाखांची संपत्ती आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे 61.29 लाख रूपये, तर झारखंडचे मुख्यमंत्री रघूबर दास 72.72 लाख रूपयाच्या संपत्तीसह चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.

शिक्षणात श्रीमंत मुख्यमंत्री

शिक्षणाच्या बाबतीत सिक्कीमचे मुख्यमंत्री पी. के. चामलिंग हे सर्वात समोर आहेत. यांच्याकडे पीएचडी आहे. देशातील 39 टक्के मुख्यमंत्री हे पदवीधर आहेत, तर 32 टक्के मुख्यमंत्र्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. 16 टक्के मुख्यमंत्री हे पदव्युत्तर असून, 10 टक्के मुख्यमंत्र्यांचे माध्यमिक शिक्षणही पूर्ण झालेले नाही.

 

Related posts: