|Sunday, January 20, 2019
You are here: Home » विविधा » आत्मिक प्रेमाचे मंदिर म्हणजे ‘काळीजकाटा’ ; डॉ. द.ता भोसले यांचे गौरवोद्गार

आत्मिक प्रेमाचे मंदिर म्हणजे ‘काळीजकाटा’ ; डॉ. द.ता भोसले यांचे गौरवोद्गार 

सुनील जवंजाळ यांच्या कादंबरीचे सांगोल्यात प्रकाशन

ऑनलाईन टीम / पुणे

आत्मिक प्रेमाचे सुंदर मंदिर म्हणजे ‘काळीजकाटा’ कादंबरी होय, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांनी येथे व्यक्त केले.

पुण्यातील ‘चपराक प्रकाशना’च्या वतीने सुनील जवंजाळ लिखित ‘काळीजकाटा’ या कादंबरीचे सांगोला तालुक्मयातील चोपडी या गावात प्रकाशन करताना डॉ. भोसले बोलत होते. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, ‘चपराक’चे प्रकाशक घनश्याम पाटील, ग्रामीण कथाकार अप्पासाहेब खोत, सुदाम मोरे, कल्याण शिंदे, पुरूषोत्तम सदाफुले, राजेंद्र वाघ, रोहित खरगे, अंकुश गाजरे, संदीप नाझरे, दादासाहेब बाबर, नंदकुमार बाबर, संतोष बाबर, रामचंद्र केंगार, रमेश बाबर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, या कादंबरीत उच्च प्रतीच्या प्रेमभावना अतिशय सुंदरपणे व्यक्त केल्या आहेत. आत्मिक प्रेमाचे सुंदर वर्णन या कादंबरीत करण्यात आले आहे. मनाने मनावर, आत्म्याने आत्म्यावर प्रेम कसे करावे, याची शिकवण ही कादंबरी देते. प्रेमाच्या सर्व भावनांचा या कादंबरीत प्रभावी आविष्कार झाला आहे. त्यामुळे आत्मिक प्रेमाच्sं सुंदर मंदिर म्हणजे ही कादंबरी, असे मला वाटते.

घनश्याम पाटील म्हणाले, पुणे-मुंबईचा सांस्कृतिक केंद्रबिंदू ग्रामीण महाराष्ट्राकडे वळला आहे. वाचनसंस्कृती कमी होत असून, ग्रामीण लेखक गुणवत्तापूर्ण लिहित नाहीत, मराठीत सशक्त प्रेमकथा येत नाहीत, अशा सगळय़ा अंधश्रद्धांना आणि गैरसमजांना सुनील जवंजाळ यांनी या कादंबरीच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ही एक अतिशय काव्यात्म शोकात्म कादंबरी असून मराठी साहित्यात या कादंबरीचे वेगळेपण दखलपात्र ठरेल.

Related posts: