|Sunday, January 20, 2019
You are here: Home » Top News » डिएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीचे कागदपत्र सादर

डिएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीचे कागदपत्र सादर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झालेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पुन्हा एकदा 50 कोटी भरण्यास अपयशी झाले आहेत. हायकोर्टात सुनावणीवेळी डीएसकेंनी लिलावसाठी 12 कोटी संपत्तीचे कागदपत्र हायकोर्टात सादर केली आहेत.

डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले. काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने डी. एस .कुलकर्णी यांना फटकारत काहीही करा, भीग मागा पण गुंतवणुकदारांचे पैसे कधी देणार आहात याची माहिती द्या ,असे सांगितले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत डीएसके 50 कोटी भरण्यास पुन्हा अपयशी झाले आहेत. यावेळी डीएसकेंनी लिलावासाठी 12 कोटींची संपत्ती तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश हायकोर्टात दिला आहे. 22फेब्रुवारीला मुंबई हायकोर्ट निकाल देणार आहे.दरम्यान, बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने 100 कोटींचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी डीएसकेंना 200 कोटींची संपत्ती तारण ठेवावी लागणार आहे.

 

Related posts: