|Friday, January 18, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » ​​पुण्यात १६ व १७ फेब्रुवारी दरम्यान होणार पुणे डिझाइन फेस्टिवल

​​पुण्यात १६ व १७ फेब्रुवारी दरम्यान होणार पुणे डिझाइन फेस्टिवल 

ऑनलाईन टीम / पुणे

नवनिर्मितीमधील उर्जा आणि डिझाईन मागील विचार अधिक चांगल्या माध्यमाच्या मदतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने पुण्यातील ‘असोसिएशन ऑफ डिझाईनर्स ऑफ इंडिया’ अर्थात एडीआय यांच्या वतीने बाराव्या पुणे डिझाईन फेस्टिव्हलचे आयोजन शुक्रवार दि. १६ व शनिवार दि. १७ फेब्रुवारी रोजी हयात रिजन्सी येथे करण्यात आले आहे. ‘डिझाइनिझम’ ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना असून याद्वारे शहरात डिझाईन विषयक दोन दिवसीय महोत्सव होणार आहे.

अनेकविध रचनाकार, संकल्प चित्रकार, आरेखक आणि अभिकल्पक यांना एकत्रित आणणा-या या दोन दिवसीय महोत्सवात विविध क्षेत्रात वापरण्यात येणारी अनेक प्रकारची डिझाइन प्रणाली, त्याविषयीचे मार्गदर्शन, कार्यशाळा, नामांकित डिझाईनर्सची व्याख्याने, या क्षेत्रातील बदलती तंत्रज्ञाने, नव्या दिशा या आणि यासारख्या अनेक विषयावर चर्चा, परिसंवाद यांचा समावेश असेल.

याबरोबरच सदर परिषदेत डिझायनिस्टचा डिझाईनकडे पाहण्याचा दृष्टीकोन, निर्मितीकडे पाहण्याची तत्त्वप्रणाली, सेवा, उत्पादने आणि दळणवळण निर्मितीसाठी आवश्यक ते तत्व व विचारधारा यांचाही समावेश असणार आहे. सदर परिषदेत तब्बल २२ परिसंवाद, ६ कार्यशाळा, ३ चित्रपट स्क्रीनिंग, २ मार्गदर्शक सत्रे, एक पॅनेल डिस्कशन आणि २ डिझाईन अॅवॉर्ड  नाईट्स असणार असल्याचे इडीआयच्या वतीने कळविण्यात आले आहे.

महोत्सवाची सुरुवात शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता होईल. महोत्सवाच्या उद्घाटन भार्गव आणि नीरज मिस्त्री या डिझायनर पिता-पुत्रांच्या सरोद सहवादनाने होईल. त्यानंतर हायपर कलेक्टीव्हचे के. व्ही. श्रीधर (पॉप्स) आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले युरोपमधील क्रॉस-कल्चर डिझायनर तारेक अत्रीसी यांच्या व्याख्यानाने होईल.

याबरोबरच डिझाईन थिंकर म्हणून सर्वत्र नावलौकिक मिळविलेले व नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन (एनआयडी) अहमदाबादचे वरिष्ठ व्याख्याते प्रा. एम. पी. रंजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी ठेवण्यात येणाऱ्या व्याख्यानाच्या सत्रात सस्टेनॅबिलीटी व्हिजनरी नील्स पीटर फ्लिंट, सोशल इनोव्हेटर स्वप्नील चतुर्वेदी हे उपस्थितांशी संवाद साधतील. यावर्षीच्या पीडीएफ़चा समारोप हा ऑगिल्वी इंडियाच्या सोनल डब्राल यांच्या व्याख्यानाने होईल.     

Related posts: