|Sunday, January 20, 2019
You are here: Home » Top News » निती आयोगामध्ये आरएसएसचे लोक ; राहुल गांधी

निती आयोगामध्ये आरएसएसचे लोक ; राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / बंगळुरू

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा आरएसएस व भाजपावर टीका केली आहे. निती आयोगामध्ये आरएसएसच्याच मंडळींचा भरणा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राहुल गांधी चार दिवसाच्या कर्नाटक दौऱयावर आहेत. आज बिजनेस लीडर्स व प्रोफेशनल यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस व भाजपात थेट टक्कर होणार, असे दिसून येत आहे. आपली सत्ता राखण्यासाठी भाजपा व आरएसएसवर राहुल गांधी यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे.

ते म्हणाले, भारताची विदेश निती ही आरएसएसमुळे बिघडत चालली आहे. मंत्रालयात व इतर विभागात आरएसएसची मंडळी काम करतात. मोदी सरकार हे संघ चालवते. सचिवपदावरील नियुक्ती ही आरएसएसच करते. भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे असून, हा पक्ष खोटे बोलणाऱयांचा आहे.

 

Related posts: