|Friday, January 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत पंतप्रधान चर्चा करणार

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत पंतप्रधान चर्चा करणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे  उत्पन्न दुप्पट करण्याच्या मुद्दय़ावर 19 व 20 फेब्रुवारीला देशभरातील 250 तज्ञांसोबत चर्चा करणार आहेत.

उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकारने दोन वर्षाअगोदरच केली होती. अर्थसंकल्पातही याचा पुनरुच्चार केला आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या  19 व 20 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये या विषयावर देशभरातल्या 250 तज्ञांसोबत पंतप्रधान मोदी हे चर्चा करणार आहेत. दिल्लीतील पुसा इंन्स्टिटय़ूटमध्ये शेतीसंबंधीत तज्ञांची मते ते एकून घेणार आहेत, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

 

 

Related posts: