|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आजऱयाजवळील रामतीर्थ यात्रेला उत्साहात प्रारंभ

आजऱयाजवळील रामतीर्थ यात्रेला उत्साहात प्रारंभ 

प्रतिनिधी/ आजरा

आजरा शहरापासून जवळच असलेल्या रामतीर्थ यात्रेला मंगळवारी महाशिवरात्री दिवशी उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवार व बुधवार अशी दोन दिवस ही यात्रा चालणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त येथील महादेव मंदिरात अभिषेक तसेच विविध धार्मिक विधी करण्यात आले. याशिवाय श्रीराम मंदिर, हनुमान, माऊली मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंत यात्रा स्थळापर्यंत वाहने जात होती. मात्र दुपारनंतर भाविकांची गर्दी वाढू लागल्याने यात्रेच्या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीसांनी दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्कीग व्यवस्था रामतीर्थ फाटय़ानजीक केली. भाविकांना रामतीर्थवर ये-जा करण्यासाठी आजरा आगाराच्यावतीने खास गाडय़ांची सोय करण्यात आली होती.

Related posts: