|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गोविंदराव हायस्कुलच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार

गोविंदराव हायस्कुलच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयामार्फत दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या खेलो इंडिया खो खो स्पर्धेतील महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकाविले, सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघात गोविंदराव हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजच्या रोहन कोरे, ऋषिकेश श्sिंदे, आदर्श मोहिते, रोहन शिंगाडे या चार खेळाडूंचा समावेश होता. नेत्रदिपक कामगिरीने विजयश्री मिळवून महाराष्ट्र संघाचे नाव विजेतेपदावर कोरण्यास या चार खेळाडूंचा सिंहाचा वाटा होता. या कामगिरीबद्दल त्यांचा गौरवार्थ गोविंदराव हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजच्यावतीने त्यांचा मानपत्र देवून प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मदनलाला बोहरा, हरिष बोहरा इचलकरंजी शहर वाहतुक पोसिल निरीक्षक अरूण पवार यांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज पुतळजवळ विजयी मिरवणूकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थी, विद्यर्थींनी मोठय़ा संख्येने हजर होते. खेळाडूंनी अत्यंत मोलाची कामगीरी करत गोविंदराव हायस्कूल व इचलकरंजी नगरीचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचविले याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. तसेच या खेळाडूंचे कौतुक प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केले.

यावेळी राजगोपालजी डाळ्या, लक्ष्मीकांत पटेल, मारूतराव निमणकर, अहमंद मुजावर, राजन उरूणकर, हरीहर होगाडे, तात्यासो कुंभोजे, बाळू पोकार्डे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य एन.एम.घोडके , स्वागत ए.के.राजापूरे यांनी तर सुत्रसंचालन विकास कांबळे यांनी केले.

Related posts: