|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पुस्तकी ज्ञानाबरोबरच आवडी निवडी जोपासा

पुस्तकी ज्ञानाबरोबरच आवडी निवडी जोपासा 

वार्ताहर/ कबनूर

प्रत्येकांनी चांगल्या गोष्टी शिकत राहिल्या पाहिजेत. ज्ञानाचे ओझे कधीच होत नाहीत.पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपल्या आवडी व छंद जोपासावयाला हवेत, यातूनच आदर्श विद्यार्थी घडू शकतात. त्याचप्रमाणे पाऊलो पाऊली येणार्या प्रलोभनापासून कटाक्षाने स्वत:ला दुर ठेवा. आयुष्यात खुप गोष्टी शिकायच्या आहेत. सतत वाचन करा. आपले ज्ञान संपादन करून एक आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करा,असे मत संजय देशपांडे यांनी व्यक्त केले.

  डि.ए.मणेरे चॉरिटेबल ट्रस्ट संचलित मणेरे हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज या विद्यालयाचा 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचा ‘शुभचिंतन’ समारंभ प्रसंगी संजय देशपांडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष केटकाळे होते. तर ट्रस्टी ज्योति मणेरे, साक्षी मणेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वागत प्रचार्य उर्मिला माने यांनी केले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका पुष्पा एwनापूरे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी संस्थापक जेष्ठ नेते सुधाकर मणेरे, ज्योती मणेरे, साक्षी मणेरे, श्री.पागडे, प्रचार्या उर्मिला माने, मुख्याध्यापिका तसलिम मणेर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून आपले मनोगत व्यक्त केले.

माजी मुख्याध्यापिका वैशाली कुलकर्णी, मलिक मणेर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन सुधा शेलेदार यांनी तर प्रेमा कांबळे यांनी मानले.

Related posts: