|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » श्री शिखरजी यात्रा 11 वे वर्ष सांगता समारोह

श्री शिखरजी यात्रा 11 वे वर्ष सांगता समारोह 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

जैन समाजातील सर्वात महत्वाचे व आस्थेचे श्रध्दाधान असणारे श्री.सम्मेद शिखरजी सिध्दक्षेत्र होय. जैन समाजामध्ये 24 तीर्थकर होऊन गेले. त्यापैकी 20 तिर्थकारांचे मोक्षस्थान सम्मेद शिखरजी पहाडावर आहे. जैन समाजातील अनेक श्रावक व श्राविका पावनभुमी असलेल्या सम्मेद शिखरजी दर्शनासाठी जात असतात, पायी चालत पहाटे 3 वाजलेपासून दुपारी 3 पर्यंत अखंड 12 तास दर्शनासाठी हजारो श्रावक श्राविका भक्तीने जात असतात.

सिध्दक्षेत्राच्या दर्शनाचा लाभ जैन समाजातील आर्थिक असहाय्य लोकांना घडावा. या उद्देशाने दर वर्षी 108 लोकांना रेल्वेने यात्रेचे नियोजन केले जाते. ‘जैन तीर्थयात्री सेवा ट्रस्ट’ या ट्रस्ट तर्फे गेली 11 वर्षे ही योजना राबवित आहेत. यामुळे हजारो लोकांना देव दर्शनासाचा लाभ घेता येत आहे. या सांगता समारोहावेळी सर्व यात्रेकरू उपस्थित होते. श्री पार्श्वनाथ मंदिरमध्ये सामुदाईक पुजा करून यात्रेकरूंचा सत्कार करणेत आला.

यावेळी ट्रस्टचे चेअरमन रविंद्र देवमोरे यांनी प्रत्येक जिवाला आपला जन्म सार्थक करणेसाठी धर्मचरणाशिवाय पर्याय नाही. धर्मच प्रत्येक जिवाला सुखशांती प्रदाण करू शकतो. असे मत मांडले. या कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टचे पदाधिकारी, मान्यवर, श्रावक श्राविका उपस्थित होते. स्वागत गजराज पाटणी, प्रस्तावणा सुमित बोरगांवे यांनी केले, तर महावीर मोळेकर यांनी आभार मानले.

 

Related posts: