|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चक्रेश्वरवाडी येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्र साजरी

चक्रेश्वरवाडी येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्र साजरी 

प्रतिनिधी/ सरवडे

चक्रेश्वराच्या नावान चांगभलं, हर…हर…महादेवाच्या जयघोषात राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील महाशिवरात्र यात्रा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली. डोंगरमाथ्यावरील निसर्गाच्या कुशीतील हा परिसर आज सोमवारी  शिवमय झाला.

दूरवरून आलेल्या भाविकांनी येथील तपसा, चक्रेश्वर मंदिरात श्री दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सोमवारी रात्री शिवलीलामृत ग्रंथांची पारायणे झाली. यामुळे सारी रात्र शिवमय झाली होती. चक्रेश्वरवाडी येथील मंदिरामध्ये पहाटे बारा वाजता जलाअभिषेक, दुग्धअभिषेक झाल्यानतर काकडाआरती झाली व मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर येथील मुख्ये मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. दुपारी बारा वाजता श्रीची पालखी येथील मंदिरातून चक्रेश्वराचे मुख्ये अधिष्ठान असणाऱया चक्रेश्वर डोंगरावरती पारंपारिक वाद्याच्या गजरात नेण्यात आली. येथील वयोवृद्ध लक्ष्मण भांदिगरे, सखाराम विटू रणदिवे, मारुती करपे, गणपती नरके, सखाराम भाऊ रणदिवे यांनी करंडी वाद्याने सर्वाना मंत्रमुग्ध केले.

वळीवडे येथे राहणारे रणजितसिंह कुसाळे यांच्यासह प्रेड सर्कल तळाशी यांनी मंडप उभारून यात्रेकरूना मोफत उपवासाच्या फराळाचे वाटप केले. तर बारडवाडी येथील स्वामी समर्थ भक्त मंडळ, ट्रष्टने मोफत चहापाणी व सरबताचे वाटप, तसेच ज्वेलर्स आणि चव्हाण बंधू तळाशी यांनी महाप्रसादाचे आयोजन केले. यात्रा सुस्थितीत पार पाडण्यासाठी आरोग्य कर्मचारी, राधानगरी पोलीस, होमगार्ड आणि स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या स्वयंसेवक, मंडळांचे कार्यकर्ते, यात्रा कमिटी सक्रीय होते. 

 

Related posts: