|Friday, February 22, 2019
You are here: Home » उद्योग » कर चोरी रोखल्यास जीएसटी उत्पन्नात वाढ

कर चोरी रोखल्यास जीएसटी उत्पन्नात वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीसपर्यंत जीएसटीतून मिळणारे उत्पन्न 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. कर चोरी रोखण्यासाठी कठोर प्रतिबंध आणि ई वे बिल लागू झाल्यास हा आकडा पार करणे शक्य आहे असे अर्थ मंत्रालयातील अधिकाऱयांना वाटते. या उपायांमुळे कर आकडेवारीमध्ये वाढ होण्यास मदत होईल.

जीएसटी रिटर्न फायलिंग प्रक्रिया पूर्ण प्रकारे स्थिर झाल्यानंतर पूर्ण विवरण तयार करणे आणि जीएसटी फायलिंग माहिती प्राप्तिकर रिटर्नबरोबर जोडण्यात येणार आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात जीएसटीतून मिळणारे उत्पन्न 7.44 लाख कोटी रुपयांवर पोहोचेल असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत 4.44 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षातील आकडेवारी एप्रिल महिन्यात जारी करण्यात येईल. नवीन आर्थिक वर्षात उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येतील असे सांगण्यात आले.

पुढील वर्षात जीएसटीतून मिळणारे उत्पन्न कमी असण्याचा अंदाज आहे. सरकारकडून करचोरी रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर पहिल्याच म्हणजे जुलैमध्ये 95 हजार कोटी रुपयांचे संकलन झाले होते. मात्र ऑगस्टमध्ये 91 हजार कोटी, सप्टेंबरमध्यं 91150 कोटी, ऑक्टोबरमध्ये 83 हजार कोटी, नोव्हेंबरमध्ये 80808 कोटी आणि डिसेंबरमध्ये 86703 कोटी रुपयांचा कर जमा झाला.

 

Related posts: