|Saturday, December 15, 2018
You are here: Home » उद्योग » पीपीएफ, पोस्ट ऑफिस योजना नियमांत होणार बदल

पीपीएफ, पोस्ट ऑफिस योजना नियमांत होणार बदल 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पीपीएफ आणि पोस्ट ऑफिस समवेत अल्प बचत योजनांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहे. या नवीन नियमांनुसार अल्प बचत योजना मुदतीपूर्वी बंद करणे सोपे जाणार आहे. या निर्णयाने वैद्यकीय समस्या अथवा शैक्षणिक वापरावेळी ही बचत वापरता येईल. सरकारने बचत प्रमोशन कायदानुसार पब्लिक प्रोव्हिडंड फंड ऍक्ट आणि सरकारी बचत प्रमाणपत्र कायदा यांचे विलीनीकरण केले आहे. यामुळे बचत योजनांसाठी नियम सुलभ करण्यात येत आहेत.

अल्पवयीन मुलांसाठी बचत योजना सुरू करत गुंतवणूक करण्यासाठीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सध्याच्या कायद्यानुसार अल्प बचत योजनांमध्ये अल्पवयीन मुलांच्या नावाने कोणतीही गुंतवणूक करण्याची तरतूद नाही. याव्यतिरिक्त दिव्यांग मुले आणि दिव्यांग जेष्ठ नागरिकांसाठी बचत योजना खाते सुरू करण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. प्रस्तावित विधेयकात याबाबत सुचना आहेत.

 

 

Related posts: