|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केवळ एका ओळीमुळे आपची कोंडी

केवळ एका ओळीमुळे आपची कोंडी 

महत्वाची जाहिरात करावी लागणार रद्द, त्यामुळे नाराजी

  वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार लवकरच आपली 3 वर्षे पूर्ण करत आहे. या निमित्त 3 वर्षांमध्ये केलेल्या कामांची जाहिरात करण्याचा सपाटा त्या सरकारने लावला आहे. तथापि, या जाहिरातींमधील केवळ एका ओळीमुळे या जाहीराती रद्द करण्याची वेळ आली आहे. कारण दिल्ली सरकारचा कोणताही विभाग ही ओळ मान्य करण्यास तयार नाही.

‘वो कहते है जब आप सच्चाई और इमानदारी के रास्ते चलते है, तो ब्रम्हांड की सारी दृष्य और अदृष्य शक्तीयां आपकी मदद करती है’ असे हे वाक्य आहे. हे वाक्य या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री केजरीवाल उच्चारताना दाखविण्यात आले आहे. याचा साधारण अर्थ असा आहे की जेव्हा आपण प्रामाणिक आणि सत्य यांच्या आधारे मार्गक्रमणा करीत असता, तेव्हा विश्वातील सर्व दृष्य आणि अदृत्य शक्ती आपल्याला साहाय्य
करतात.

मात्र हे वाक्य सर्वोच्च न्यायालयाने निर्दिष्ट केलेल्या नियमांच्या अनुसार नाही. जाहिरातींमध्ये जो मजकूर आहे, त्याला संबंधित सरकारी विभागाची मान्यता असावयास हवी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. मात्र, या वाक्याला कोणतेही सरकारी खाते मान्यता देण्यात तयार नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांची कोंडी झाली आहे.

त्यामुळे केजरीवाल यांनी सोमवारी सकाळी सर्व ज्येष्ठ सनदी अधिकाऱयांची बैठक बोलाविली होती. बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अन्शू प्रकाश हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत जाहिरातींना विलंब होत असल्याचे कारण विचारले. त्यावेळी या वाक्याचा संबंध सांगण्यात आला. या वाक्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. नेमके कोणाला उद्देशून हे वाक्य आहे, हे समजत नसल्याने त्याला मान्यता देण्यास कोणताही विभाग तयार नाही, ही बाब केजरीवाल यांना सांगण्यात आला. यावर मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त
केले.

दोन दिवसात दिल्ली सरकारचा तिसरा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. मात्र जाहिरातीतील या एका वाक्याने प्रसिद्धी मोहीमेचा प्रारंभ करणे अद्याप शक्य झालेले नाही. जाहिरातीतील बाकी मजकुराला सर्व विभागांची मान्यता आहे. केजरीवाल हे वाक्य वगळण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनाचीही गोची झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Related posts: