|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » व्हॅलेंटाईन डे ला पोलिसांचा कडक पहारा

व्हॅलेंटाईन डे ला पोलिसांचा कडक पहारा 

प्रतिनिधी/ सातारा

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आज हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, कास, ठोसेघर, यवतेश्वर येथे तरूणाई मोठया संख्येने गर्दी करणार आहे. यासाठी कोणतीही वाईट घटना घडु नये म्हणुन पोलिसांकडून कडक पहारा ठेवण्यात आलेला आहे. आज कोणीही गैरवर्तन करताना अढल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

प्रेमाचा दिवस आपल्या प्रियकर व प्रियसी बरोबर साजरा कारण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा व्हॅलेटांईन डे आज आहे. व हा दिवस इतर दिवसांसारखा न साजरा करता काही विशेष करण्यासाठी सर्वांचीच धडपड चालु आहे. म्हणून आज सकाळपासून एकमेकांना भेटून, खरेदी केलेल्या भेटवस्तु दिल्या जातील. हा दिवस न विसणारा ठरावा म्हणून हॉटेल मध्ये विविध आवडीचे पदार्थ, आईस्क्रीम खाण्यासाठी सर्व हॉटेल, आईस्क्रीम पार्लर फुल्ल होवून जातील. तर हा दिवस एकमेकांसोबत घालवण्यासाठी प्रियकर-प्रियसी कास, ठोसघर, यवतेश्वर, कुरनेश्वर अशा ठिकाणी जातात. यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणावर गर्दी होणार आहे. या पर्यटन ठिकाणी कोणीही गैरवर्तन करू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच गैरवर्तन करणाऱयावर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Related posts: