|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शाहुनगर मध्ये पाणी वेळेवर नाही…

शाहुनगर मध्ये पाणी वेळेवर नाही… 

प्रतिनिधी/ सातारा

पाणीपुरवठा हा वेळेवर होत नसल्यामुळे शाहुनगर येथे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तरी सकाळी पाणी सोडण्याची वेळ निश्चीत नसल्याने नागरिकांची तारबळ उडत आहे. व या संपुर्ण भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून कधी तर पाणी येत नाही. तसेच हा त्रिंशकु भाग असल्याने लक्ष दिले जात नाही.

      शहरातील शाहुनगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असलेल्या पाणी पुरवठा हा वेळेवर होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या भागात मध्यरात्री पाणी सोडण्यात येते ते पाहटे 5.30 पर्यंत असते. यामुळे या भागातील नागरिकांना मध्यरात्री उठुन पाणी भरावे लागते. तर दररोज मध्यरात्री येणारे पाणी न आल्याने नागरिकांची चांगलीच झोपमोड होत आहे. पण हे पाणी कमी दाबाने सोडण्यात येते. यामुळे पाणी जास्त वेळ असूनही त्यांचा पुरवठा हा होत नाही. तसेच एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. व उन्हाळयात तर पाणी येत  नाही या भागातील नागरिकांना टॅकर द्वारे पाणी मागवावे लागते. असे असतानाही याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे.

शाहुनगर हा त्रिशंकु भाग…

शाहुनगर हा त्रिशंकु भागात येत असल्याने या परिसरात निर्माण होणाऱया समस्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असते. येथील नगरिकांनी अनेक वेळा पाणी प्रश्नावर आवाज उठवला असला तरी कोणीही लक्ष देत नाही. व प्रत्येक कामाची चालढकल केली जाते.

पाणी टंचाई होत नाही…

या परिसरात पाणी हे वेळेवर तसेच पाणी कमी दाबाने येत नाही. प्राधिकरणाकडून कामे चालली आहेत. त्यामुळे गेल्या मंगळवारी पाणी कमी दाबाने सोडण्यात आले होते. तसेच या मंगळवारी पाणी येतच नाही. या भागात पाणी पुरवठा वेळेवर केला जातो. पाणी टंचाई असे काही होत नाही

Related posts: