|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारकरांचे वाचले 89 कोटी रूपये

सातारकरांचे वाचले 89 कोटी रूपये 

प्रतिनिधी / डॅनियल खुडे

नोटबंदी 8 नोव्हेंबर 2016 ला जाहीर होताच सातारा जिल्हा बँकेने तत्परता दाखवत हातात असलेली 89 करोड रूपये तत्काळ रिझर्व्ह बँकेत भरले. त्यामुळे सातारकर शेतकऱयांचा एक रूपयाही बुडला नाही. मात्र सांगली, कोल्हापुर, पुणे अहमदनगर, अमरावती, नागपुर, यवतमाळ व नाशिक अशा 8 बँकांनी ही तत्परता दाखवली नाही यामुळे या बँकेचे एक हजार व पाचशे रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या बॅंकेचे 112 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सातारा जिल्हा बँकेने तत्परता दाखवून एका रूपायाचेही ग्राहकांचे नुकसान होऊ दिले नाही. त्यामुळे सध्या बँक संचालक व कर्मचाऱयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातुन एक हजार व पाचशे रूपयांच्या नोटा बंद करत असल्याचे जाहीर केले व जिल्हा बँकांनी त्यांच्याकडीन रक्कम त्वरित रिझर्व्ह बँकेत भरावे, असे जाहीर केले होते. त्यावेळी सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व बँकेचे मुख्याधिकारी राजेंद सरकाळे यांनी तातडीची बैठक घेवून दि. 8 रोजी बँकेच्या हातात असलेले 89 कोटी रूपये रिझर्व्ह बँकेत भरण्याचा तत्काळ निर्णय घेतला व हाच निर्णय महत्वाचा ठरला. यामधून बँकेचा अभ्यास व दूरदृष्टीपणा जाणवतो. बँकेच्या या निर्णयामुळे शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांचे सुमारे 89 कोटी रूपये वाचले व हे पैसे रिझर्व्ह बँकेने बदलूनही दिले.

परंतु 8 नोव्हेंबर पुर्वीचे पैसे सांगली, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती, यवतमाळ, नाशिक या 8 बँकांनी भरण्यास विलंब केल्याने रिझर्व्ह बँकेने त्यांना पैसे बदलून देण्यास नकार दिला. त्यामुळे या 8 ही बँका दाद मागण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्याआधीच नाबार्डने नवा आदेश काढून राज्यातील आठ बँकांकडील सर्व शिल्लक जुन्या नोटींची रक्कम बुडित खाती जमा करून एनपीए नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकांना हा मोठा धक्का समजला जात आहे. त्यामुळे या बँकेचे मुख्याधिकारी व अध्यक्षांची मंगळवार दि. 13 रोजी पुणे येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत नाबार्डच्या निर्णयाचा धिक्कार करण्यात आला तसेच मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा भेट घेवून न्याय देण्याची मागणी करण्याचे ठरले तसेच सर्वोच्च न्यायालयात तातडीने न्याय मिळण्यासाठी ध्येय धोरणे ठरवण्यात आली.

या सर्व घाईगडवडीत सातारा जिल्हा बँकेने ग्राहकांबददल दाखलेले आत्मीयाता, तळमळ व एक ही रूपयाचे नुकसान न होऊ दिल्याबददल सध्या बँकेचे संचालक मंडळ, अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्याधिकारी डॉ. राजेंद्र सरताळे यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Related posts: