|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाठार स्टेशन- वेळे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम रामराजेंच्या प्रयत्नातून मार्गी

वाठार स्टेशन- वेळे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम रामराजेंच्या प्रयत्नातून मार्गी 

वार्ताहर/ कोरेगाव

वाठार स्टेशन ते वेळे रस्त्याचा भाग असलेल्या  सोनके ते पिंपोडे बु? रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर आता वाई वेळेमार्गे वाठार स्टेशन रस्त्याच्या सोळशी ते वेळे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लागले. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नातुन केंद्रीय रस्ते विकास निधीतुन या कामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे

         उत्तर कोरेगाव विभागाला राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ला जोडणारा वाई वेळेमार्गे वाठार स्टेशन रस्ता महत्वाचा असून अरुंद रस्त्यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत होत होती, यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी अनेक दिवसांपासून होती अखेर हा रस्ता रुंद करण्यासाठी विधानपरिषदचे  सभापती रामराजे निंबाळकर यांनी केंद्रीय स्तरावरुन  केंद्रीय रस्ते निधीतुन पाठपुरावा करीत सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध केला.  रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जि. प. सदस्य मंगेश धुमाळ व पदाधिकारी यांच्या हस्ते झाले. यावेळी  मुंबई क?षी उत्पन्न बाजार समिती चेअरमन बाळासाहेब सोळस्कर, कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे,  कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष गुलाबराव जगताप, यांची प्रमुख उपस्थिती होती,  यावेळी मंगेश धुमाळ म्हणाले, बरेच वर्ष अपेक्षित असलेल्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुर्णत्वाकडे जात असल्याचे पाहुन संपुर्ण उत्तर कोरेगाव मधील जनता समाधान व्यक्त करीत आहे, या विभागाच्या विकासकामांसाठी रामराजे निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण व  संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातुन  काम करण्यास कुठेही कमी पडणार नाही. वसना उपसा जलसिंचन योजना पुर्णत्वाकडे जात असताना ज्या ज्या ठिकाणी स्थानिक काही अडचणी निर्माण झाल्या त्या संबंधीतांना भेटुन सोडविल्या आहेत. ही योजना सभापती रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या पाणी या विषयावरील प्रचंड अभ्यासामुळे व वरिष्ठ पातळीवरील प्रयत्नामुळे लवकरच सुरु होत आहे. याचेही समाधान उत्तर कोरेगावच्या जनतेमध्ये आहे  या कार्यक्रमाच्या प्रसंगी दादासाहेब जगताप, संभाजी धुमाळ, प्रविण धुमाळ, राहुल धुमाळ, दयाराम सोळस्कर व सुनिलराव गरुड, राजेंद्र धुमाळ, नितीन धुमाळ, संतोष धुमाळ, संग्राम सोळस्कर, विशाल सोळस्कर, बाळासाहेब यादव विविध गावचे पदाधिकारी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: