|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कास रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 80 कोटींची तरतुद

कास रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 80 कोटींची तरतुद 

प्रतिनिधी/ सातारा

जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराकडे जाणारा रस्ता चौपदरीकरण होणार असल्यामुळे कासच्या वैभवात आता आणखी भर पडणार आहे. तसेच कास पठार फुलल्यावर होणारी ट्राफिक जामची समस्या कायमची संपणार आहे. रस्त्याचे चौपदरीकरण ही सातारकरांसह पर्यटकांसाठी गोड बातमी ठरली आहे. बोगदा ते कास हा रस्ता चारपदरी होणार असून पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे. बोगदा-कास या रस्त्याच्या कामासाठी 80 कोटीच्या केंद्र आणि राज्य शासनाने मंजूरी दिली असून या कामाची टेंडर्स प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच कामाचा शुभारंभ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

  आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले असून या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात दुजोरा दिला आहे. कासच्या विस्तीर्ण पठारावर विविध रंग छटा असणाऱया फुलांनी अल्पावधीतच पर्यटकांना भुरळ घातली आहे. युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये कास पठाराची नोंद झाली. देश-विदेशातून अवघ्या चार ते पाच वर्षाच्या कालखंडात पर्यटक पावसाची उघडझाप आणि हिरवी शाल पांघरलेल्या निर्सगाच्या सानिध्यात आनंद लुटण्याबरोबरच कासचे फुलांसमवेत रमण्यत मग्नग्न असलेले दोन ते तीन लाख पर्यटक हजेरी लावू लागले आहेत. पर्यटकांची गर्दी वाढल्याने महाकाय कोसळणाऱया वजराई धबधब्याचे नयनरम्य दृष्य पहाण्यासाठी गर्दी वाढू लागल्याने युनोस्कोने कास पठार पर्यटन स्थळाची दखल घेतली. भारतातील पर्यटकांबरोबरच परदेशी पाहुण्यांची हजेरी कास पठार वाढली आहे.

दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार त्याच बरोबर सलग जोडून येणाऱया शासकिय सुटय़ांदिवशी पर्यटकांच्या लक्षणीय संख्येमुळे बोगदा ते कास रस्त्यावर वाहतुकीची मोठय़ा प्रमाणावर कोंडी होत असल्याने तासन्तास पर्यटकांना घाटात ट्राफिक जाम होवून हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. बऱयाचदा पोलीस यंत्रणेलाच कासला जाणाऱया पर्यटकांना थांबवावे लागत होते. कासची वाढती लोकप्रियता आणि पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता यावा यासाठी वनविभागाने ऑनलाईन बुकिंग प्रणाली वापरून ट्राफिक जामवर तात्पुरती मलमपट्टी केली.

 पर्यटकांचा ओघ लक्षात घेवून बोगदा ते कास रस्त्यादरम्यान शेकडो हॉटेल व्यवसायिकांनी आपले व्यवसाय उभारल्याने बेरोजगारीचा प्रश्न संपुष्टात आलाच शिवाय कासच्या दुर्गम भागाला जगाच्या नकाशावर नेण्याचे काम कास फ्लॉव्हर व्हॅलीने केले. पर्यटनाला चालना मिळावी, पर्यटकांचा सुखाचा व्हावा या हेतुने या बोगदा कास रस्त्याची अडचण लक्षात घेवून आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने यश आल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

 

Related posts: