|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात महाशिवरात्री उत्साहात

राज्यात महाशिवरात्री उत्साहात 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात महाशिरात्री उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. तिर्थक्षेत्र हरवळे, सप्तकोटेश्वर नार्वे यासह राज्यातील सर्वच शिवमंदिरातून काल महाशिवरात्री उत्सव साजरा झाला. पहाटे पाच वाजल्यापासून शिवमंदिरातून अभिषेक सुरू होते. हरवळे, नार्वे या तिर्थक्षेत्रावर तर भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली होती. शिवमंदिरातून अभिषेक व दर्शनासाठी भाविकांच्या प्रचंड मोठय़ा रांगा दिसून येत होत्या.

राज्यात शिवरात्री उत्सवानिमित्त काही ठिकाणी भजन कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. त्याचबरोबर संध्याकाळी उशिरा विविध ठिकाणी दर्जेदार कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. राज्यातील हरवळे, नार्वे ही प्रसिद्ध तिर्थक्षेत्रे असल्याने दरवर्षी या ठिकाणी अभिषेक व दर्शनासाठी भाविक प्रचंड गर्दी करतात. पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविक अभिषेक करण्यासाठी रांगा लावतात. सकाळी 9 ते 10 वा. भाविकांची प्रचंड गर्दी होते. संध्याकाळी उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी येतात.

गोव्यासह शेजारील राज्यातील लोकही शिवरात्री उत्सवानिमित्त हरवळेत गर्दी करतात. नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिरातही शिवरात्री उत्सवाला भाविक प्रचंड गर्दी करतात. गोव्यातील बहुतेक सर्वच गावामध्ये शिवरात्री उत्सव साजरा केला जातो. शिवमहिमावर आधारित किर्तनाचे कार्यक्रमही केले जातात. राज्यातील लाखो भाविक शिवरात्री उत्सवात सहभागी होऊन शिवपींडीकेवर दुधाचा अभिषेक करतात व दर्शन घेतात. भाविकांची गर्दी वाढत असल्याने आता प्रमुख तिर्थक्षेत्र स्थळावर योग्य पद्धतीचे आयोजन करण्याबरोबरच पोलीस संरक्षणही ठेवले जाते.

Related posts: