|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ग्रेटर पणजीच्या बदल्यात सिक्वेरांचा पुतळा विकला

ग्रेटर पणजीच्या बदल्यात सिक्वेरांचा पुतळा विकला 

प्रतिनिधी / पणजी

ग्रेटर पणजी पीडीएच्या बदल्यात जॅक सिक्वेरांचा पुतळा गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपला विकला अशी टीका काँगेसचे सरचिटणीस गिरीश चोडणकर यांनी केला असून सिक्वेरांचा पुतळा ठरावाच्या बाजूने 21 जणांचे बहुमत होत असल्यामुळेच तो सभापतींनी फेटाळल्याचे महटले आहे. त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करून सदर ठरावास राज्य विधानसभेत मांडण्याची अनुमती द्यावी, अशी मागणीही श्री. चोडणकर यांनी केली आहे.

 सिक्वेरांच्या पुतळय़ासाठी काहीही करू अशी भाषणे टोकणाऱया गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांनी हिंमत दाखवून मंत्रीपदाचा, सरकारचा त्याग करावा व शब्द पाळावा, असे आव्हानही चोडणकर यांनी दिले आहे.

पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर यांनी भाजप व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर हल्ला चढवला. ग्रेटर पणजी पीडीए म्हणजे मोठी पीडा आणि गोमंतकीयांची जमीन लुटण्याचे तसेच गोंयकारपणाच्या नावाखालीज् गोमंतकीयांना संपवण्याचे कारस्थान असल्याचे ते म्हणाले.

पर्रीकर मोडत होते बोटे

ग्रेटर पणजी पीडीए म्हणजे ग्रेटर ‘करप्शन’ तसेच जमिनीचे रुपांतरण असल्याची टीका करून चोडणकर म्हणाले की पर्रीकर यांनी मोन्सेरात यांना एकेकाळी भ्रष्टाचारी ठरवले होते. आता त्यांनीच पुन्हा मोन्सेरातना पीडीए बहाल केली. पांडुरंग मडकईकर, माविन गुदिन्हो, विजय सरदेसाई, रोहन खंवटे, विश्वजीत राणे यांच्या नावाने पर्रीकरांनी बोटे मोडली होती. त्यांनाच घेऊन पर्रीकर आता सरकार चालवत आहेत. याचे स्पष्टीकरण पर्रीकरांसह त्या सर्वांनी जनतेला देण्याची गरज असल्याचे चोडणकर यांनी नमूद केले.

ग्रेटर पणजी पीडीए म्हणजे जमिनी खाण्याचे, विकण्याचे प्लॅनिंग असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. मोन्सेरात मागील दाराने भाजपच्या दारात पोहोचल्याचे ते म्हणाले.

ठराव मंजूर होणार म्हणून फेटाळला

काँग्रेसचे 16, गोवा फॉरवर्डचे 3, चर्चिल आलेमाव व मायकल लोबो अशा 21 आमदारांचा जॅक सिक्वेरांच्या पुतळा ठरावास पाठिंबा असल्याचे आता उघड झाले आहे. हा ठराव चर्चेला आल्यास आणि मतदान झाल्यास तो बहुमताने मंजूर करावा लागणार असल्यानेच सभापती डॉ. सावंत यांच्यासमोर तो फेटाळण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. म्हणून त्यांना सर्व ठराव फेटाळावे लागले, असे श्री. चोडणकर यांनी नमूद केले.

 

Related posts: